सिमला मिरची, टोमॅटोचे दर गडगडले; नागरिकांना मोफत वाटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:24 AM2021-08-23T04:24:38+5:302021-08-23T04:24:38+5:30

सांगोला तालुक्यात डाळिंबावरील तेल्या, मर, कुजवा रोगाने मेटाकुटीला आलेला शेतकरी डाळिंबाला पर्याय म्हणून सिमला मिरची, टोमॅटो लागवडीकडे वळला. सिमला ...

Simla pepper, tomato prices plummeted; Citizens felt free | सिमला मिरची, टोमॅटोचे दर गडगडले; नागरिकांना मोफत वाटले

सिमला मिरची, टोमॅटोचे दर गडगडले; नागरिकांना मोफत वाटले

Next

सांगोला तालुक्यात डाळिंबावरील तेल्या, मर, कुजवा रोगाने मेटाकुटीला आलेला शेतकरी डाळिंबाला पर्याय म्हणून सिमला मिरची, टोमॅटो लागवडीकडे वळला. सिमला मिरचीचे उत्पादन लागवडीपासून तीन महिन्यांत पहिला तोड सुरू होता, तो पुढे दोन महिने उत्पादन चालू राहते. तालुक्यातील अजनाळे लिगाडेवाडी, सोनलवाडी, बागलवाडी, लक्ष्मीनगर, बुद्धेहाळ, वाकी-शिवणे, हलदहिवडी, शिरभावी, वासूद-अकोला, वाटंबरे, बलवडी, चिकमहूद, महूद, गायगव्हाण, नरळेवाडी, मानेगाव आदी भागात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी सिमला मिरची, टोमॅटोची लागवड केली आहे.

गतवर्षी याच सिमला मिरचीला किलोला ६५ ते ७० रुपये जास्तीत जास्त तर कमीत कमी २५ रुपये भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले होते. यंदा मात्र परिस्थिती बदलली असून सिमला मिरचीला किलोचा दर ३ ते ५ रुपयांपर्यंत खाली उतरल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे झालेला खर्चही निघणेही मुश्कील झाले आहे. सिमला मिरची लागवडीपासून ते तोड येईपर्यंत झालेला खर्च व मार्केटपर्यंत पाठवण्याचा खर्च भागवताना शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सिमला मिरची काढून टाकण्याबरोबरच मार्केटला पोहोचवण्याऐवजी रस्त्याच्या कडेला टाकून देत आहेत. तर काही शेतकरी टोमॅटो व सिमला मिरची नागरिकांना मोफत वाटून समाधान मानत आहेत.

कोट :::::::::::::::

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुख्य शहराच्या ठिकाणी लाॅकडाऊनमुळे व खेड्या-पाड्यातील आठवडा बाजार बंद असल्याचा परिणाम सिमला मिरचीच्या दरावर झाला आहे. सांगोल्यात दररोज १० किलोप्रमाणे ५०० कॅरेट सिमला मिरचीची आवक आहे. मात्र ३ ते ५ रुपये दर खाली आल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. अनलॉकनंतरच भाजीपाल्याचे दर सुधारणार आहेत.

- सुरेश माळी

अडत व्यापारी, सांगोला

फोटो ओळ :::::::::::::::::::

महूद-सांगोला रोडवरील बायपास पुलाच्या पश्चिमेकडील बाजूस शेतकऱ्यांनी सिमला मिरची टाकून दिल्याचे छायाचित्र.

Web Title: Simla pepper, tomato prices plummeted; Citizens felt free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.