सीना-भोगावती जोडकालव्याचे होणार सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:15 AM2021-07-19T04:15:57+5:302021-07-19T04:15:57+5:30

मोहोळ विधानसभा मतदारसंघातील सीना-भोगावती जोडकालवा होण्यासाठी माजी आमदार राजन पाटील, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, आमदार यशवंत माने यांच्या पाठपुराव्यानुसार १७ ...

Sina-Bhogawati joint survey will be conducted | सीना-भोगावती जोडकालव्याचे होणार सर्वेक्षण

सीना-भोगावती जोडकालव्याचे होणार सर्वेक्षण

googlenewsNext

मोहोळ विधानसभा मतदारसंघातील सीना-भोगावती जोडकालवा होण्यासाठी माजी आमदार राजन पाटील, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, आमदार यशवंत माने यांच्या पाठपुराव्यानुसार १७ रोजी सोलापूर येथे जयंत पाटील यांच्यासोबत बैठक आयोजित केली होती. या आयोजित बैठकीत सिना-भोगावती जोड कालवा होण्याकरिता सर्वेक्षण करण्याचे आदेश जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी बैठकीत दिले.

या बैठकीस सिना-भोगावती जोडकालवा संघर्ष समितीचे नूतन अध्यक्ष डॉ.संदेश कादे, जगन्नाथ कोल्हाळ, गोविंद पाटील, विजयकुमार पोतदार, अनिल कादे, सोपान काकडे उपस्थित होते.

----

४० वर्षांपासूनच्या मागणीला यश

मोहोळ, बार्शी, माढा व उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची सिना-भोगावती जोड कालवा करण्याची मागणी जवळजवळ ४० वर्षांपासून करण्यात येत आहे. ही योजना मार्गी लावण्यासाठी माजी झेडपी सदस्य सुशांत कादे यांनी सीना-भोगावती जोड कालवा संघर्ष समितीची स्थापना करून संघर्ष उभा केला होता. त्याचेच फळ म्हणून माजी आ.राजन पाटील व आ.यशवंत माने, डॉ.संदेश कादे यांच्या पाठपुराव्याने शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे जिल्ह्यातील सिना-भोगावती जोड कालव्याचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिल्या. यामुळे शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

----

फोटो : १८ मोहोळ

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे स्वागत करताना, सीना-भोगावती जोडकालवा संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ.संदेश कादे, माजी आ.राजन पाटील, आ.यशवंत माने.

Web Title: Sina-Bhogawati joint survey will be conducted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.