पाण्याअभावी सीना नदी कोरडीठाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:19 AM2021-04-03T04:19:28+5:302021-04-03T04:19:28+5:30
विद्युत पंप जोडण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग मंगळवेढा : उजनी धरणातून सोडण्यात आलेले पाणी मंगळवेढा तालुक्यातील भीमा नदीकाठच्या गावातून पुढे मार्गस्थ ...
विद्युत पंप जोडण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग
मंगळवेढा : उजनी धरणातून सोडण्यात आलेले पाणी मंगळवेढा तालुक्यातील भीमा नदीकाठच्या गावातून पुढे मार्गस्थ झाले आहे. ते पाणी शेतीला देण्यासाठी शेतकऱ्यांची विद्युत पंप जोडण्याची लगबग सुरू आहे. मात्र महावितरणच्या वतीने केवळ दोन तास वीज पुरवठा केला जात असल्याने शेतकऱ्यांना पाणी असूनही ते पिकांना देता येत नाही.
मशीनद्वारे गव्हाची रास करण्यास प्राधान्य
मोहोळ : तालुक्यातील भीमा नदीकाठच्या गावांमध्ये गहू लागवडीचे क्षेत्र जास्त आहे. सध्या हा गहू काढणीयोग्य झाला असून मजुरांकडून काढणी केल्यास जास्त खर्च होता. शिवाय मजुरांची टंचाई आहे. त्यापेक्षा मशीनद्वारे गव्हाची रास करण्यास शेतकरी प्राधान्य देऊ लागले आहेत.
खंडित वीज पुरवठ्याचा पिकांवर परिणाम
करमाळा : उन्हाची तीव्रता वाढत असताना महावितरणच्या वतीने थकीत वीज बिल वसुलीसाठी ट्रान्सफार्मरवरूनच वीज पुरवठा खंडित केला. परिणामी पाणी असूनही शेतकऱ्यांना ते पिकांना देता आले नाही. या खंडित वीज पुरवठ्याचा उन्हाळी पिकांवर परिणाम झाला असून ते सुकू लागले आहेत.