अभियांत्रिकी प्रवेशात ‘सिंहगड’ राज्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:49 AM2021-02-05T06:49:36+5:302021-02-05T06:49:36+5:30

विद्यार्थ्यांना सर्व सोयींनीयुक्त, तणावमुक्त शिक्षण पद्धती, उत्कृष्ट इन्फ्रास्ट्रक्चर, विद्यापीठ गुणवत्ता, उद्योजक क्षेत्रातील करिअरच्या संधी, सामाजिक भान या गोष्टींवर सिंहगड ...

‘Sinhagad’ first in the state in engineering admission | अभियांत्रिकी प्रवेशात ‘सिंहगड’ राज्यात प्रथम

अभियांत्रिकी प्रवेशात ‘सिंहगड’ राज्यात प्रथम

Next

विद्यार्थ्यांना सर्व सोयींनीयुक्त, तणावमुक्त शिक्षण पद्धती, उत्कृष्ट इन्फ्रास्ट्रक्चर, विद्यापीठ गुणवत्ता, उद्योजक क्षेत्रातील करिअरच्या संधी, सामाजिक भान या गोष्टींवर सिंहगड इन्स्टिट्यूट गेल्या अनेक वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून देशाला परफेक्ट इंजिनिअर देत आहे. चालू शैक्षणिक वर्षांत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी सिंहगड इन्स्टिट्यूटने सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाईन लेक्चर आयोजित करून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले आहे. यामुळे ४११८ विद्यार्थ्यांनी ‘सिंहगड पॅटर्न’ला सर्वाधिक पसंती दिली आहे.

दुसऱ्या कॅपराऊंड फेरीत सर्व जागा खुल्या झाल्याने सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश न मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांना सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये अभियांत्रिकी शिक्षणाची संधी मिळाली आहे. अधिक माहितीसाठी प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, प्रा. सोमनाथ कोळी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन महाविद्यालयातर्फे करण्यात आले आहे. (वा.प्र.)

Web Title: ‘Sinhagad’ first in the state in engineering admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.