साहेब आम्ही व्यापारी लोक खूप गरीब आहोत आमच्यावर अन्याय करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 01:22 PM2020-07-05T13:22:45+5:302020-07-05T13:23:21+5:30
लक्ष्मी मार्केटमधल्या व्यापाऱ्यांनी मांडली कैफियत: लक्ष्मी मार्केटसमोर केले ठिय्या आंदोलन
सोलापूर: लक्ष्मी मार्केट येथे भाजी विक्री करणाऱ्या दोघांवर कारवाई करत असताना व्यापाऱ्यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करून आंदोलन केले. साहेब आम्ही व्यापारी लोक आहोत आम्ही खूप गरीब आहोत, आम्ही काय खायचं आणि कसं लिहायचं सांगा... आमच्यावर तुम्ही कारवाई करत आहात अशी कैफियत व्यापाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांसमोर मांडली.
लक्ष्मी मार्केट परिसरात सकाळी भाजी विक्रेत्यांनी नेहमीप्रमाणे आपली दुकाने थाटली होती. वास्तविक पाहता पोलिस प्रशासनाने व्यापाऱ्यांना लक्ष्मी मार्केट या परिसरात भाजी विक्री करण्यास बंदी घातली आहे, त्यांना होम मैदान येथे पर्यायी जागा देण्यात आली आहे. असे असताना विक्रेत्यांनी विक्रेत्यांनी लक्ष्मी मार्केट येथे रविवारी सकाळी बाजार भरला होता. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात येताच त्याने जाऊन मार्केट बंद करण्याचा प्रयत्न केला. व्यापारी ऐकत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी दोघा भाजी विक्रेत्यांना ताब्यात घेतले. कारवाई करण्यासाठी दोघांना फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे आणण्यात आले. आपल्या दोन व्यापाऱ्यांना पोलिसांनी पकडून नेले पाहताच मार्केटमधील अन्य व्यापारी महिला व पुरुष मंडळींनी फौजदार चावडी पोलिस ठाणे गाठले.
पोलिस ठाण्याच्या समोर असलेल्या प्रवेशद्वारासमोर व्यापाऱ्यांनी ठिय्या मांडला. आमच्यावर कारवाई करू नका आम्ही पोटासाठी बसलेलो आहोत आम्हा गरिबांना का पकडता अशी विनवणी व्यापारी करू लागले. पोलिसांनी त्यांना रस्त्यावर न बसता पुन्हा तुम्ही घरी जावा असा सल्ला देत होते मात्र व्यापारी ऐकायला तयार नव्हते. फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय साळुंखे व प्रवीण पाटील फौजदार चावडी पोलिस ठाण्यात समोर आले त्यांनी व्यापाऱ्याशी संवाद साधला व त्यांना समजावून सांगत घरी जाण्यास सांगितले. तब्बल दीड तासानंतर ौजदार चावडी पोलीस ठाण्यासमोर असलेला ठिय्या आंदोलन व्यापार्याने मागे घेतला.
------------------------
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लक्ष्मी मार्केट येथील व्यापाऱ्यांना हो मैदान येथे भाजी विक्री करण्यास परवानगी दिली आहे असे असतानाही त्यांनी मार्केटमध्ये गर्दी करून भाजीविक्री करीत असल्याचे लक्षात आले. आदेशाचं पालन केलं नाही म्हणून दोन व्यापाऱ्यांना कारवाईसाठी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात आणण्यात आले त्यामुळे व्यापारी पोलीस ठाणे येथे आले होते, त्यांना समजावून सांगण्यात आले आहे नियमाप्रमाणे कारवाई ही संबंधित व्यापाऱ्यांवर केली जाईल.