सोलापुरातील 'कोरोना' बाधित रुग्णांच्या नवसंजीवनीसाठी 'मदर' च्या भूमिकेत 'सिस्टर'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 08:37 AM2020-05-12T08:37:50+5:302020-05-12T08:45:36+5:30

जागतिक परिचारिका दिन विशेष; अहोरात्र रुग्णांची सेवा करणाऱ्या परिचरिकांना 'सलाम'

'Sister' in the role of 'Mother' for the rehabilitation of 'Corona' infected patients | सोलापुरातील 'कोरोना' बाधित रुग्णांच्या नवसंजीवनीसाठी 'मदर' च्या भूमिकेत 'सिस्टर'

सोलापुरातील 'कोरोना' बाधित रुग्णांच्या नवसंजीवनीसाठी 'मदर' च्या भूमिकेत 'सिस्टर'

Next
ठळक मुद्देपरिचारिका दिनानिमित्त आज सोलापुरात विविध कार्यक्रमपरिचारिकांच्या कार्याला सलाम देण्यासाठी संस्था, संघटना एकवटल्या

शितलकुमार कांबळे

माणूस अंथरूणाला खिळला, एखादा आजार जडला की रक्ताचे नातेही सैल होते. आपलीच माणसे दुरावतात. अशावेळी रक्ताचे कुठलेही नाते नसताना आणि कोणत्याची नात्याचे संबंध नसताना रुग्णालयात आपलं म्हणून साथ देते. औषध देते. मानसिक आधारही तीच देते. काही सांगावेसे वाटले तर ऐकणारीदेखील तीच असते. अशा या जिवाभावाच्या ‘सिस्टर’ला जागतिक परिचारिका दिनानिमित्त सलाम !
-----------------------------------------

कौटुंबिक जबाबदारी पार पाडत कोरोनाशी दोन हात
वैद्यकीय सेवा क्षेत्रात परिचारिका हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यांच्याशिवाय, या सेवेला पूर्णत्व मिळू शकत नाही. एकीकडे कामाचे वाढणारे तास, रुग्णांची सेवा करताना येणारा मानसिक ताण, असुरक्षितता तर दुसरीकडे स्वत:च्या कौटुंबिक जबाबदाºया अशा या सर्व बाजू त्या भक्कमपणे सांभाळत आहेत.
 कोरोना आजारामुळे परिचारिकांचे महत्व अधिक वाढले आहे. रुग्णांची काळजी घेताना रुग्णाकडून इतरांची सुरक्षा करणे तसेच स्वत:ला विषाणूपासून दूर ठेवण्याची कसरत त्यांना कळावी लागते. डॉक्टरांपेक्षा रुग्णांना सोबत या परिचारिकांचीच मिळते.


सध्या कोरोना आजाराचे वाढते स्वरुप पाहता त्यांची जबाबदारी अधिक वाढली आहे. रुग्णांची सेवा करतानाच आपल्या कुटुंबियांना याची लागण होऊ  नये याची दक्षता घ्यावी लागते. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात कोरोनावर उपचार करण्यात येतात. आयसोलेशन वॉर्डमध्ये काम करणाºया या परिचारिका एक महिना आपल्या कुटुंबियांपासून दूर राहतात. आयसोलेशन वॉर्डमधील काम संपल्यानंतर पुन्हा क्वारंटाईन होतात. या दरम्यान फोनद्वारेच कुटुंबियांशी संवाद साधता येतो. कोरोना वॉर्डात काम करताना काही वेळा त्यांच्या घरातूनही विरोध होतो. कुटुंबियांना समजावून प्रसंगी विरोध पत्करुन ते रुग्णांची सेवा करत आहेत.
----------------------------–------------
पाणीही पिता येत नाही
पीपीई (पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्वापमेंट ) परिधान केल्यानंतर सहा तास पाणीही पिता येत नाही. हे किट डोक्यापासून पायापर्यंत असल्याने घामाच्या धारा येतात. जेव्ही किट काढतो, तेव्हाच बरे वाटते, असा किट परिधान केल्यानंतरचा अनुभव एका परिचारिकेने सांगितला.
----------
कोरोना वॉर्डामध्ये रुग्णांची काळजी घेण्यासोबतच त्यांना सकस आहार देते. येथे काम करत असल्याने काही दिवस घरच्या जबाबदाºया पार पाडता आल्या नाहीत. मला तीन मुले आहेत. त्यांच्या जेवणाचा थोडा त्रास झाला. हॉटेलही बंद असल्याने फक्त मॅगी, खिजडी, दूध, फळे असे एक महिनाभर ते खात होते.  
- रुथ कलबंडी, अधिसेविका, सिव्हील हॉस्पीटल
--------------------------------


माझ्या आई बाबांना कोरोना आजाराविषयी माहीती मिळाली. ते गाबरले. त्यांनी कोरोना वॉर्डात काम करु नको असे बजावले.  पीपीई कीट घातल्यानंतर कसे सुरक्षित राहतो हे त्यांना समजावून सांगितल्यावर त्यांनी ते ऐकले. मला पाच महिण्याचा मुलगा आहे. या काळात त्याला मी फक्त दुरुनच पाहिले
     - महेश महामुनी, अधिपरिचारक, सिव्हील हस्पीटल

Web Title: 'Sister' in the role of 'Mother' for the rehabilitation of 'Corona' infected patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.