बहिणीची मोबाइल अन् कपडे खरेदी राहिली अपुरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:27 AM2021-08-20T04:27:33+5:302021-08-20T04:27:33+5:30

श्रीपूर : अकलूज- माळेवाडी रोडवर झालेल्या भीषण अपघातात ठार झालेल्या मायलेकींपैकी ओंकार हा आईला उपचारासाठी, तर बहिणीला ऑनलाइन शिक्षणासाठी ...

Sister's mobile and clothes purchase is not enough! | बहिणीची मोबाइल अन् कपडे खरेदी राहिली अपुरी!

बहिणीची मोबाइल अन् कपडे खरेदी राहिली अपुरी!

Next

श्रीपूर : अकलूज- माळेवाडी रोडवर झालेल्या भीषण अपघातात ठार झालेल्या मायलेकींपैकी ओंकार हा आईला उपचारासाठी, तर बहिणीला ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाइल खरेदी आणि कपडे खरेदीसाठी अकलूज येथे दुचाकीवरून निघाला होता. मात्र, वाटेतच भीषण अपघात झाला आणि बहिणीची मोबाइल अन् कपड्यांची खरेदी अपुरी राहिली. या घटनेने आंबे गावावर शोककळा पसरली आहे.

गंभीर जखमी असलेले दांडगे कुटुंब मूळचे चळ आंबे गावचे आहेत. हे कुटुंब वेळापूर येथे मिळेल ते काम करून भाड्याच्या घरात राहत होते.

जखमी मुलगा ओंकार हा काही महिन्यांपासून बँक ऑफ बडोदामध्ये शिपाई म्हणून काम करत होता. मयत बहीण सृष्टी पांडुरंग दांडगे ही मुलगी इयत्ता बारावीत शिकते.

आई छाया पांडुरंग दांडगे ही आजारी असल्याने तिला अकलूज येथे दवाखान्यात तर बहिणीला अभ्यासासाठी मोबाइल व कपडे खरेदीसाठी अकलूजला जात असताना काळाने मायलेकींवर घाला घातला. मयतांवर चळ आंबे येथे संध्याकाळी १० नातलगांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

ओंकार बाजूला फेकला गेला

हेवी मालवाहतूक कंटेनरचा ताबा सुटल्यामुळे समोर असलेल्या दुचाकीला धडक बसली. त्यामधील दुचाकीस्वार ओंकार दांडगे बाजूला फेकला गेला, तर छाया दांडगे व सृष्टी दांडगे या कंटेनरच्या चाकाखाली आल्या.

----

मृतदेह पाहताच कंटेनरचालक गहिवरला

कंटेनर व दुचाकी वाहनाचा अपघात झाल्यानंतर ड्रायव्हरने गाडी पुढे जाऊन थांबवली. त्याने खाली उतरून मृतदेहाची अवस्था पाहिल्यानंतर तो जागेवरच गहिवरला आणि त्याला रडू कोसळले. तोपर्यंत पोलीस घटनास्थळी आले होते. कंटेनर चालक शिवशंकर हाजी बसाप्पा (रा. नामक्कल, तामिळनाडू ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

----

पतीपासून राहत होत्या विभक्त

मयत छाया दांडगे या पती पांडुरंग दांडगे यांच्यापासून विभक्त राहत होत्या. गेल्या सात ते आठ वर्षांपासून त्या वेळापूर येथे आपल्या मुलांसमवेत माहेरी राहत होत्या. पांडुरंग दांडगे याने दुसरे लग्न केले असून, सध्या ते आंबे येथे वास्तव्यास आहेत. पती पांडुरंग वेळापूर येथे पत्नी व मुलांना भेटण्यासाठी अधूनमधून वेळापूरला जात होते. सृष्टीचे लग्न जमले असल्याचे आंबे येथील ग्रामस्थांतून सांगण्यात आले. पांडुरंग घाडगे आयुर्वेदिक औषध तयार करण्याचे काम करतात.

-----

Web Title: Sister's mobile and clothes purchase is not enough!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.