पीकविम्यासाठी पुणे येथे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:16 AM2021-06-24T04:16:43+5:302021-06-24T04:16:43+5:30

गेल्या महिन्यातील आंदोलनानंतर काही शेतकऱ्यांचे पैसे मिळाले. मात्र, अनेक शेतकरी पीकविम्यापासून वंचित असल्याने पंधरा जूनपासून पुन्हा आंदोलन करण्याचे निवेदन ...

Sit-in agitation at Pune for crop insurance | पीकविम्यासाठी पुणे येथे ठिय्या आंदोलन

पीकविम्यासाठी पुणे येथे ठिय्या आंदोलन

Next

गेल्या महिन्यातील आंदोलनानंतर काही शेतकऱ्यांचे पैसे मिळाले. मात्र, अनेक शेतकरी पीकविम्यापासून वंचित असल्याने पंधरा जूनपासून पुन्हा आंदोलन करण्याचे निवेदन देण्यात आलेले होते. भीतीपोटी कंपनीने कार्यालय बंद ठेवून आतमध्ये गुपचूप कामकाज सुरू असल्याचे समजताच शेतकरी संघटनेने कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले.

कंपनीचे व्यवस्थापक गोपाळ सोनवणे यांनी पोलिसांना बरोबर घेऊन आंदोलनस्थळी आलेल्या शेतकऱ्यांची कागदपत्रे घेत लवकरच खात्यावर रकमा जमा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

यावेळी दयानंद चौधरी, गोटू पाटील, पोपट चौधरी, बाळासाहेब भायगुडे, विठ्ठल पाटील, मनोज चौधरी, संदीप चौधरी, अमोल चौधरी, माणिक चौधरी, अरविंद चौधरी, बजरंग चौधरी, बाजीराव चौधरी, सूरज चौधरी, ज्ञानेश्वर पाटील, लालासाहेब गायकवाड, दत्तात्रय पाटील, संतोष गुंड, ऋषिकेश गायकवाड, अंबरीष गायकवाड, विनोद गायकवाड, दीपक पाटील, प्रतीकेत गायकवाड, श्रीबाल गायकवाड, विकास गायकवाड, हनुमंत गायकवाड, शैलेंद्र पाटील, अतुल गायकवाड, राकेश विधाते, नागेश पाटील, धनाजी आगलावे, सुशांत गव्हाणे, नारायण कदम, विजय नागटिळक, गणेश नागटिळक, विशाल नागटिळक, आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

----

----

फोटो : २३ बार्शी शेती

ओळी- भारती एक्सा कंपनीच्या राज्यस्तरीय कार्यालयात ठिय्या आंदोलन करताना शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड व शेतकरी.

===Photopath===

230621\2111-img-20210623-wa0028.jpg

===Caption===

राहिलेल्या शेतकऱ्यांच्या पिकविम्यासाठी पुणे येथे शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन...तोडफोडीनंतर कंपनी व पोलीसांची धावपळ

Web Title: Sit-in agitation at Pune for crop insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.