घरी बसूनच ऐका पंढरपूर पोटनिवडणुकीचा निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:17 AM2021-04-29T04:17:26+5:302021-04-29T04:17:26+5:30
पोटनिवडणुकीच्या निकालासाठी करण्यात आलेल्या तयारीसंदर्भात माहिती सांगण्यासाठी प्रांत अधिकारी गजानन गुरव यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी तहसीलदार सुशीलकुमार ...
पोटनिवडणुकीच्या निकालासाठी करण्यात आलेल्या तयारीसंदर्भात माहिती सांगण्यासाठी प्रांत अधिकारी गजानन गुरव यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर, पोनि. अरुण पवार यांनी उपस्थित होते.
पुढे गजानन गुरव म्हणाले, इव्हीएमवरील मतमोजणी ही एकूण १४ टेबलांवर (राखीव ६ टेबल) ३८ राऊंडमध्ये होणार आहे. टपाली मतपत्रिकांची मोजणी ही एकूण ०२ टेबलवर (राखीव २ टेबल) होणार आहे. सैन्यदलातील वर्गीकृत मतदारांच्या ई टी पी बी एस ची मोजणी ०१ टेबलवर (राखीव १ टेबल) होणार आहे. प्रत्यक्ष मतमोजणी प्रक्रियेसाठी ३६-अधिकारी, ४४ कर्मचारी व ३८- शिपाई कर्मचारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून राखीव १८-अधिकारी, २५-कर्मचारी व ११-शिपाई कर्मचारी यांच्या नियुक्त्या करणेत आल्या आहेत.
या पोटनिवडणुकीत १ लाख २० हजार ७१८ पुरुष व १ लाख ३ हजार ३४८ स्त्री, इतर २ असे एकूण २ लाख २४ हजार ६८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. सैनिक मतदारांची संख्या ५४६ त्यापैकी प्राप्त ईटीपीबीएस मतपत्रिकांची संख्या ७३ आहे. तसेच टपाली मतदारांची जमा झालेले टपाली मतदान ३२५२ झाले आहे. मतमोजणी कक्षामधील मतमोजणीची प्रक्रिया संपुर्णपणे ही सी.सी.टी.व्ही. व व्हिडीओ कॅमेऱ्याच्या निगराणीखाली होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी सांगितले.
निगेटिव्ह टेस्ट येणाऱ्यांनाच मतमोजणी कक्षात प्रवेश
मतमोजणीसाठी येणाऱ्या उमेदवार/त्यांचे मतमोजणी प्रतिनिधी यांना कोविड-१९ टेस्ट करणे बंधनकारक असल्याचे कळविण्यात आले आहे. मतमोजणी कक्षात प्रवेश करण्यापूर्वी ज्यांनी कोविड टेस्ट केलेली नाही. अशांची कोविड टेस्ट मतमोजणी कक्षाच्या बाहेर केली जाईल व त्यांची टेस्ट निगेटिव्ह येईल अशाच उमेदवार त्यांचे मतमोजणी प्रतिनिधी यांना मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार आहे.
ॲपवर पाहता येणार निकाल
मतमोजणी कक्षाच्या बाहेरील क्षेत्रामधील उमेदवारांचे समर्थक, कार्यकर्ते व नागरिक यांच्यासाठी फेरीनिहाय मतमोजणीची आकडेवारी/निवडणूक निकाल हा आकाशवाणी केंद्रावरुन वेळोवेळी प्रक्षेपित केला जाणार आहे. मतमोजणी कक्षाच्या बाहेरील क्षेत्रामधील उमेदवारांचे समर्थक, कार्यकर्ते व नागरिक यांना फेरीनिहाय मतमोजणीची आकडेवारी/निवडणूक निकाल हा श्ङ्म३ी१ ऌी’स्र’्रल्ली अस्रस्र चा वापर करूनही पाहता येणार आहे.
----
फोटो : पंढरपुरातील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव, तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर, पोनि. अरुण पवार.