सरकारच्या छाताडावर बसून मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षण मिळवून देणारच; मनोज जरांगे- पाटलांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 09:18 PM2023-10-05T21:18:17+5:302023-10-05T21:18:44+5:30

मंगळवेढ्यात आरक्षणासाठी सकल मराठा समाजाचा मेळावा

Sitting on the government's, the Marathas will get Kunabi reservation; Announcement of Manoj Jarange- Patil | सरकारच्या छाताडावर बसून मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षण मिळवून देणारच; मनोज जरांगे- पाटलांची घोषणा

सरकारच्या छाताडावर बसून मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षण मिळवून देणारच; मनोज जरांगे- पाटलांची घोषणा

googlenewsNext

मल्लिकार्जुन देशमुखे
मंगळवेढा : मराठा समाजाला अनेक पिढ्यांपासून आरक्षणाच्या वेदना आहेत. त्यासाठी हा लढा उभा राहिला आहे. सर्वसामान्य मराठा समाजातील प्रत्येकजण या लढ्यात उतरला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठ्यांना सरसकट कुणबी मराठा  आरक्षण मिळवून देणारच आहे, परंतु त्यासाठी सर्व मराठा बांधवांनी पाहिला व शेवटचा लढा समजून एकजूट होणे गरजेचे आहे, असे आवाहन मराठा आरक्षण लढ्याचे योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

मंगळवेढा येथे मराठा आरक्षणासाठी शिवप्रेमी चौकातील आठवडा बाजारच्या प्रांगणात आयोजित जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती प्रारंभी दामाजी चौकात मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र तसेच आरक्षण मिळण्यासाठी लढा देत असलेले मनोज जरांगे पाटील यांचे जेसीबीतून पुष्यवृष्टी वरून जंगी स्वागत करण्यात आले.

मी मराठा समाजासाठी आरक्षण मिळवून देण्यासाठी लढत आहे. मला कशाची गरज किंवा अपेक्षा नाही. माझ्या समाजाच्या मुलांचे शिक्षणासाठी तसेच नोकरीसाठी जे बेहाल होत आहेत, बेरोजगारअभावी आत्महत्या करीत आहेत. ते पाहावत नाही. एका टक्क्यांनीही शिक्षणाची व नोकरीची संधी हुकली. त्यावेळी माझ्या मराठा समाजाला काय वेदना होतात, हे आता आपल्याला समजायला लागले आहे. मी महाराष्ट्रातील  मराठा बांधवांना सरसकट आरक्षण मिळवून देऊन मराठ्यांना विजयी करणार आहे. इंचभरही माझी नियत ढळू न देता मी ज्यांना माझं माय बाप मानतो त्या  मराठा समाजासाठी गद्दारी करणार नाही, मी खानदानी मराठा आहे. उपोषण सोडण्याची विनंती करण्यासाठी आलेल्या प्रत्येक मंत्र्यांना मी सांगत होतो की, जे काही तुम्हाला सांगायचे ते येथेच सर्वांसमोर सांगा. माझ्या कानात नको. महाराष्ट्रातील  मराठ्यांना सरसकट कुणबी मराठा आरक्षण मिळवून देणारच आहे, परंतु त्यासाठी सर्व मराठा बांधवांनी एकजूट होणे गरजेचे आहे, असे आवाहन मनोज जरांगे-पाटील यांनी.  

    काही लोकांना, सर्व पक्षांना विनंती करतो, सगळे एक व्हा, मराठा आरक्षण द्या... आपल्यातील मतभेद दूर ठेवा. सरकार एखादा डाव करण्याची शक्यता आहे, आपल्यात गट पाडू शकते, त्यामुळे सावध राहा. आरक्षण मिळेपर्यंत लढत रहा. जाळपोळ उद्रेक होऊ देऊ नका, आंदोलन शांततेतच करा, असं आवहन त्यांनी यावेळी केलं आहे.

२४ ऑक्टोबर ही आरक्षण देण्याची अंतिम मुदत

सरकारने मागितलेली वेळ १४ऑक्टोबर रोजी संपणार आहे. या दिवशी आंतरवाली येथे १०० एकरांवर भव्य मेळावा घेतला जाईल. १४ ऑक्टोबर ही आरक्षण देण्याची अंतिम मुदत असून १० दिवड बोनस दिला आहे त्यानंतर भूमिका ठरवू, असे जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.

Web Title: Sitting on the government's, the Marathas will get Kunabi reservation; Announcement of Manoj Jarange- Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.