साडेआठ किलो चांदीचे दागिने जप्त

By admin | Published: July 5, 2016 08:49 PM2016-07-05T20:49:45+5:302016-07-05T20:49:45+5:30

गुन्हे शाखेच्या पथकाने रेकॉर्डवरील दोन घरफोड्यांना अटक करुन त्यांच्याकडून साडेआठ किलो चांदीचे दागिने हस्तगत केले.

Six and a half kg of silver jewelery seized | साडेआठ किलो चांदीचे दागिने जप्त

साडेआठ किलो चांदीचे दागिने जप्त

Next


शहर गुन्हे शाखेची कारवाई : दोन घरफोड्यांना अटक
सोलापूर : गुन्हे शाखेच्या पथकाने रेकॉर्डवरील दोन घरफोड्यांना अटक करुन त्यांच्याकडून साडेआठ किलो चांदीचे दागिने हस्तगत केले. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता गुन्हे शाखेने व्यक्त केली आहे. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली.
हरजितसिंग शिशुपालसिंग टाक (वय २८, रा. तळेहिप्परगा गणपती मंदिर पाठीमागे, ता. उत्तर सोलापूर) व मलखानसिंग मायासिंग दुधानी (वय २७, रा. गुरुनानक नगर, रेल्वे स्टेशन, विजापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
हे दोघे यापूर्वी शिंदे चौकातील एका सराफाचे दुकान फोडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. गुन्हे शाखेचे पथक त्यांच्या शोधात असताना जुना तुळजापूर नाका येथे ते दोघे घुटमळत असल्याची खबर लागली. सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर व बाळासाहेब शिंदे यांनी सापळा रचून मंगळवारी त्या दोघांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे तपास केला असता, गुन्ह्याची कबुली दिली. या तपासात दोघांव्यतिरिक्त अन्य दोघांचा समावेश असून चौघांनी मिळून शांती चौकातील मुस्लीम कब्रस्तानसमोरुन एक कार पळवल्याची कबुलीही दिली आहे. शिंदे चौकातील सराफाचे दुकान फोडून ८.५ किलो दागिने चोरल्याचे सांगितले. याबरोबरच त्यांच्याकडून एक दुचाकी असा एकूण ३ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले, सहा. पोलीस आयुक्त शर्मिष्ठा वालावलकर, पोलीस निरीक्षक शंकर जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. दत्तात्रय कोळेकर, बाळासाहेब शिंदे, पोहेकॉ. दगडू राठोड, अनिल वळसंगे, संजय बायस, जयंत चवरे, पोलीस नाईक राकेश पाटील, मुन्ना शेख, सुभाष पवार, मंजुनाथ मुत्तनवार, जयसिंग भोई, वसंत माने, धनंजय बाबर, गणेश शिर्के, शिवानंद भीमदे, लक्ष्मीकांत फुटाणे व निंबाळकर यांनी पार पाडली. (प्रतिनिधी)

Web Title: Six and a half kg of silver jewelery seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.