कत्तलीसाठी आणलेल्या सहा जनावरांना जिवदान
By संताजी शिंदे | Published: June 24, 2023 05:58 PM2023-06-24T17:58:26+5:302023-06-24T17:59:11+5:30
कत्तल करण्यासाठी सहा जनावरे खरेदी करून आपल्या घराजवळ न बांधता एका गवळीच्या वाड्यात बांधण्यात आले होते.
सोलापूर : कत्तलीसाठी आणलेल्या सहा जनावरांची सुटका करून त्यांना जीवदान देण्यात आले आहे. या प्रकरणी संबंधितांवर फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कत्तल करण्यासाठी सहा जनावरे खरेदी करून आपल्या घराजवळ न बांधता एका गवळीच्या वाड्यात बांधण्यात आले होते. अन्य तीन जनावरे महानगरपालिकेच्या गाळ्यात बांधून ठेवण्यात आले होते. बांधण्यात आलेली जनावरे ही कत्तल करण्यासाठी आणण्यात आल्याची माहिती अखिल भारत कृषी गोसेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांना समजली. त्यांनी पाणीवेस तालीम येतील धर्म रक्षक व पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन गवळ्याच्या घरी गेले. गवळ्याला वाड्यातील तीन जनावरांबाबत विचारना केली, तेव्हां त्याने एका व्यापाऱ्याने मला पैसे देऊन बकरी ईद पर्यंत सांभळण्यास सांगितले असे म्हणाला.
अन्य तीन जनावरे महापालिकेच्या बंद गाळ्यामध्ये बांधून ठेवल्याचे समजले. तेथेही जाऊन पहाणी केली असता बांधून ठेवलेल्या जनावराला कोणत्याही चारापाण्याची व्यवस्था केली नव्हती. सहा जनावरे ताब्यात घेण्यात आली. या प्रकरणी जनावरे ठेवून घेणारा गवळी व संबंधित व्यापारी या दोघांविरूद्ध फौजदारी चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईसाठी सोलापूर महानगरपालिका कोंडवाडा विभागाचे बाबर, तसेच अहिंसा गोशाळा फौजदार चावडीचे पोलिस अधिकारी यांचे सहकार्य लाभले. ही कामगिरी यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुधीर बहिरवाडे, पाणीवेस तालमीचे पैलवान पंकज काटकर, केतन अंजिखाने, अभिजीत जाधव, ओंकार पवार, दिग्विजय नवगीरे, अभिजीत स्वामी, अक्षय अक्कि, श्रीकांत हावीनाळ, लखन अंजिखाणे, आशिष राजेश्वर, समर्थ जाधव, वरद जट्टे, अनिश पवार, आकाश कुंभार, आतिश जावळे, रविराज हरसुरे आदींचे सहकार्य लाभले.