जनरेटरची स्टार्टर बॅटरी पळवून अतिदक्षता विभागातील सहा बालकांचा जीव घातला धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2022 11:46 AM2022-05-20T11:46:19+5:302022-05-20T11:46:25+5:30
पंढरपुरातील खासगी हॉस्पीटलमधील मोठी घटना
पंढरपूर : येथील शितल शहा हॉस्पिटलमध्ये असलेल्या जनरेटरची स्टार्टर बॅटरी बुधवारी चोरून नेहली आहे. यामुळे या हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात असलेल्या सहा बालकांचा जीव धोक्यात पडला होता. परंतु त्या ठिकाणी कोणताही अनर्थ घडला नाही.
युवराज दत्तात्री सावंत (वय २६, रा. तुंगत, ता. पंढरपूर) शीतल शहा हॉस्पिटलमध्ये उलेक्त्रियशन काम करतात. ते नेहमी कामावर गेले होते. दुपारी दोनच्या सुमारास अचानक हॉस्पीटल मध्ये जनरेटर जवळ आवाज झाल्याने कशाचा आवाज झाला म्हणुन पाहण्यास सावंत गेले. त्यांना तेथील स्टाटर बँटरी काढलेली दिसली. त्यांनी आजुबाजुस बँटरीचा शोध घेतला, असता नेहमी हॉस्पीटलकडे येणारा भारत सुखदेव माने (रा. सेंट्रलनाका, पंढरपूर) हा बॅटरी घेऊन चिल्लारीच्या झुडुपातुन पळुन गेला. हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांनी त्यास हाका मारल्या पण तो थांबला नाही. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
७० हून अधिक बालकांवर सुरू होते उपचार
यावेळी हॉस्पिटलमध्ये ७० हून अधिक बालकांवर उपचार सुरू होते. त्यामधील ६ बालक अतिदक्षता विभागात होते. अचानक लाईट गेली असती तर बॅटरी नसल्याने जनरेटर चालू झाले नसते व अतिदक्षता विभागातील बालकांचा जीव धोक्यात पडला असता असे डॉ. शितल शहा यांनी सांगितले.