पैसे घेऊनही शस्त्रक्रिया टाळणाऱ्याला सहा दिवसांची कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:23 AM2021-09-19T04:23:11+5:302021-09-19T04:23:11+5:30

बार्शी : डॉक्टर असल्याचा बहाणा करून किडनीची शस्त्रक्रिया करण्यासाठी १ लाख ७० हजार रुपये घेऊनही शस्त्रक्रिया टाळून फसवणूक केल्याप्रकरणी ...

Six days in jail for avoiding surgery despite taking money | पैसे घेऊनही शस्त्रक्रिया टाळणाऱ्याला सहा दिवसांची कोठडी

पैसे घेऊनही शस्त्रक्रिया टाळणाऱ्याला सहा दिवसांची कोठडी

Next

बार्शी : डॉक्टर असल्याचा बहाणा करून किडनीची शस्त्रक्रिया करण्यासाठी १ लाख ७० हजार रुपये घेऊनही शस्त्रक्रिया टाळून फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या दोघांना बार्शीच्या जिल्हा सत्र न्यायाधीश जगदाळे सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

प्रवीण चतुर्भुज सुतार व त्याचा सहकारी बिभीषण सुतार अशी पोलीस कोठडी मिळालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत किडनी ग्रस्त मुलाचे वडील परमेश्वर सुतार (रा. बावी, ता. वाशी, जि. उस्मानाबाद) यांनी फिर्याद दिली आहे. यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली. किडनी वरील शस्त्रक्रियेसाठी फिर्यादीस २ लाख ७० हजारांचा खर्च येतो असे सांगून १ लाख ७० हजार गोळ करून दिले होते. त्यानंतरही शस्त्रक्रिया केली नाही. फसवणूक झाली. आरोपींना बार्शी न्यायालयात उभे केले असता आठ दिवसांपूर्वी आरोपीच्या वकिलांनी जामीन मिळण्यासाठी अर्ज दिला. सरकारी वकील प्रसाद कुलकर्णी यांच्या युक्तिवादानंतर त्यावर अंतरिम जामीन नामंजूर करून न्यायालयीन कोठडी दिली. त्या आदेशावर जिल्हा सत्र न्यायालयात रिव्हिजन दाखल करून पुढील तपासासाठी पुनः आरोपीना न्यायालयात उभा करताच दोघांना २१ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

----

Web Title: Six days in jail for avoiding surgery despite taking money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.