शहरातील आणखी सहा खाजगी हॉस्पीटल 'कोरोना' उपचारासाठी ताब्यात घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 08:37 PM2020-05-25T20:37:24+5:302020-05-25T20:38:33+5:30

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती; रुग्ण वाढू लागल्याने घेतली खबरदारी

Six more private hospitals in the city will be taken into custody for ‘corona’ treatment | शहरातील आणखी सहा खाजगी हॉस्पीटल 'कोरोना' उपचारासाठी ताब्यात घेणार

शहरातील आणखी सहा खाजगी हॉस्पीटल 'कोरोना' उपचारासाठी ताब्यात घेणार

googlenewsNext
ठळक मुद्देसोलापुरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढलीकोरोना बरोबर सारी या आजाराचेही आढळले रुग्णसोलापूर शहर पोलीस संचारबंदी काळात सतर्क

सोलापूर : 'कोरोना'चे रुग्ण वाढू लागल्याने शहरातील आणखी सहा खाजगी रुग्णालये अधिगृहित करण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी सोमवार दिली.


शहर व जिल्ह्यात आता 'कोरोना'चे रुग्ण नव्याने मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. यात अत्यवस्थ रुग्णांचे प्रमाण मोठया प्रमाणावर दिसून येत आहे. सध्या सिव्हिल हॉस्पीटल, विमा, रेल्वे आणि कुंभारी येथील अश्विनी रुग्णालयात 'कोरोना'ग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. यानंतर मार्कंडेय सहकारी रुग्णालय अधिगृहित करण्याची अधिसूचना जिल्हाधिकाºयांनी काढली पण तांत्रिक अडचणीमुळे हे रुग्णालयात अद्याप सेवेत आलेले नाही. त्यामुळे आता नव्याने सहा रुग्णालये अधिगृहित करण्यात येत आहेत.


यामध्ये रामवाडीतील गंगामाई हॉस्पीटल (बेड : १00, आयसीयू :२५, वॉर्डबेड : २0, आॅक्सीजन क्षमता : ७), वळसंगकर तथा एसपी इन्स्टिट्युट आॅफ न्युरे सायन्स (५0 बेड, आयसीयु : ३0, रुम : १0, बेड :५), रघोजी किडनी, होटगी रोड (१00 बेड, आयसीयु : १0, आॅक्सीजन रूम: १५, वॉर्ड : ४, त्यात ३६ बेड आॅक्सीजनसह), अपेक्स (५0 बेड, आयसीयु:२, युनिट बेड:१६, रुम:४, वॉर्ड दोन, त्यात बेड: १८, सिटी हॉस्पीटल (८0 बेड, आयसीयु बेड:७), युनिक हॉस्पीटल (बेड: ९0, आयसीयु:७). असे ४७0 आद्ययावत बेडची व्यवस्था करण्यात येत आहे.


नवीन खाजगी हॉस्पीटल अधिगृहित करण्यात आल्यामुळे अत्यवस्थ रुग्णांवर उपचाराच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. आत्तापर्यंतच्या हॉस्पीटलमध्ये आॅक्सीजनची पुरेशी व्यवस्था नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे अत्याधुनिक सोयी असलेले खाजगी हॉस्पीटल ताब्यात घेण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

Web Title: Six more private hospitals in the city will be taken into custody for ‘corona’ treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.