सांगोला नगरपरिषदेतील अधिकाऱ्यांची सहा पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:20 AM2021-04-12T04:20:41+5:302021-04-12T04:20:41+5:30
नगर अभियंता, कनिष्ठ अभियंता (१ वर्षे २ महिने), पाणीपुरवठा अभियंता (१ वर्ष), विद्युत अभियंता (१ वर्षे ६ महिने), संगणक ...
नगर अभियंता, कनिष्ठ अभियंता (१ वर्षे २ महिने), पाणीपुरवठा अभियंता (१ वर्ष), विद्युत अभियंता (१ वर्षे ६ महिने), संगणक अभियंता (२ वर्षे ६ महिने), तर नगर रचनाकार (९ महिने) अशी शहराच्या व नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली सहा विविध रिक्त पदे आहेत. त्या-त्या रिक्त पदांवर अभियंत्यांची नेमणुका नसल्यामुळे नागरिकांची बांधकाम परवाना, पाणीपुरवठा, विजेची समस्या आदी कामे खोळंबून राहत आहेत.
मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित रिक्त पदावर अभियंत्याची नेमणूक करावी म्हणून प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत, तर आ. शहाजीबापू पाटील यांनीही राज्य नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्रव्यवहार करून रिक्त पदे भरण्याची मागणी केली आहे.
कोट :::::::::::::
नगरपरिषदेतील अभियंत्याच्या विविध रिक्त पदांबाबत प्रभाग सचिवांकडे पत्रव्यवहार केला आहे. तसेच आ. शहाजीबापू पाटील यांच्याकडून मंत्रालय स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. तूी अद्यापही रिक्त पदे भरली नाहीत. सद्य:स्थितीत अतिरिक्त कार्यभार असणाऱ्या अभियंत्यावर नागरिकांचे व कार्यालयातील कामकाज चालू आहे.
- कैलास केंद्रे, मुख्याधिकारी सांगोला.