सहा हजार विद्यार्थी देणार रविवारी सेटची परीक्षा

By बाळकृष्ण दोड्डी | Published: March 24, 2023 07:01 PM2023-03-24T19:01:36+5:302023-03-24T19:02:14+5:30

सहा हजार विद्यार्थी रविवारी सेटची परीक्षा देणार आहेत. 

 Six thousand students are going to take the set exam on Sunday  | सहा हजार विद्यार्थी देणार रविवारी सेटची परीक्षा

सहा हजार विद्यार्थी देणार रविवारी सेटची परीक्षा

googlenewsNext

सोलापूर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यामार्फत महाराष्ट्र व गोवा राज्यातील विविध विषयांच्या सहायक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी राज्यस्तरीय पात्रता (सेट) परीक्षा रविवार, २६ मार्च रोजी होणार असून त्यामध्ये सोलापुरातील एकूण १४ केंद्रांवर ६ हजार ३२२ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केल्याची माहिती येथील केंद्राचे संपर्क प्रतिनिधी तथा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील संगणकशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. विकास घुटे यांनी दिली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ केंद्र क्रमांक २० अंतर्गत सोलापूर शहरातील संगमेश्वर कॉलेज, डी. बी. एफ. दयानंद कॉलेज, वालचंद आर्ट्स अँड सायन्स कॉलेज,  हिराचंद नेमचंद कॉलेज, कस्तुरबाई शिक्षणशास्त्र महाविद्यालय, श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक, एस. ई. एस. पॉलिटेक्निक, सोशल कॉलेज, एन. बी. नवले सिंहगड कॉलेज, केगाव, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय, भारती विद्यापीठाचे अभिजीत कदम इन्स्टिट्यूट ऑफ, सोलापूर आणि विद्यापीठ कॅम्पसमधील संगणकशास्त्र संकुलात ही परीक्षा होणार आहे.

 

Web Title:  Six thousand students are going to take the set exam on Sunday 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.