सोलापूरात सोळा हजार उमेदवार देणार अराजपत्रित अधिकाऱ्याची परीक्षा
By संताजी शिंदे | Published: April 29, 2023 06:07 PM2023-04-29T18:07:31+5:302023-04-29T18:07:42+5:30
परीक्षेला १६ हजार ४४० उमेदवार बसले आहेत.
सोलापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने रविवारी घेण्यात येणाऱ्या, महाराष्ट्र अराजपत्रित अधिकारी गट 'क' व 'ब' सेवा पदासाठी शहरातील ४९ केंद्रावर संयुक्त पूर्व परिक्षा होणार आहे. परीक्षेला १६ हजार ४४० उमेदवार बसले आहेत.
शहरातील परीक्षा केंद्र असलेल्या ४९ शाळांमध्ये सकाळी ११ ते १२ या वेळेत ही परीक्षा होणार आहे. परीक्षा केंद्राच्या सभोवताली १०० मीटरच्या परिसरात फौजदारी प्रक्रीया संहिता १९७३ चे कलम १४४ कलम लागू करण्यात आले आहे. हा आदेश सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत लागू राहणार आहे. सर्व परीक्षा केंद्रावर मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट, स्मार्ट वॉच, फॅक्स, ईमेल आदींचा कसलाही वापर करता येणार नाही.
परीक्षा केंद्रावर नेमणूक करण्यात आलेले अधिकारी, कर्मचारी यांनाच प्रवेश असणार आहे. कोणत्याही वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. प्रत्येक ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. परीक्षेला डमी उमेदवार बसू नये यासाठी यंदा प्रथमच डोळे तपासणारी यंत्रणा उभारण्यात आली आहे. या व्यतीरिक्त सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत अशी माहीत निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी दिली.