लसीकरण उद्दिष्टपूर्ती धीम्या गतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:23 AM2021-07-29T04:23:07+5:302021-07-29T04:23:07+5:30
कोरोना प्रतिबंधात्मक उपायांबाबत प्रशासन अनेक वेळा कठोर भूमिका घेत आहे. ही बाब जेवढ्या प्रखरतेने केली जात आहे तेवढ्या प्रखरतेने ...
कोरोना प्रतिबंधात्मक उपायांबाबत प्रशासन अनेक वेळा कठोर भूमिका घेत आहे. ही बाब जेवढ्या प्रखरतेने केली जात आहे तेवढ्या प्रखरतेने लसीची उपलब्धता व आग्रह प्रशासन का करीत नाही ? असा संतप्त सवाल नागरिकांमधून पुढे येत आहे. लसीचा तुटवडा गेल्या काही महिन्यांपासून सतत असल्यामुळे शेकडो नागरिकांना लसीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. याबाबतीत लोकप्रतिनिधी व प्रशासन आपली जबाबदारी झटकून बाजूला होण्याचा प्रयत्न करीत आहेत.
तालुक्यात लसीकरणासाठी ३ लाख ४७ हजार ५४० लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. मात्र, अद्याप अंदाजे १७ टक्के लोकांनाच पहिला डोस मिळाला असल्यामुळे लसीकरणाची धीमी गती चिंताजनक ठरत आहे.
----
तिसऱ्या लाटेचे मिळणारे संकेत लसीकरण वेळेत पूर्ण न झाल्यास धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपायांबरोबरच लसीकरणाबाबत हलगर्जीपणा करू नये यात लोकप्रतिनिधी व प्रशासनाने गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.
- डॉ. आप्पासाहेब देशमुख, माजी उपनगराध्यक्ष
----
प्रवास लसीकरणाचा
२७ जुलैपर्यंत तालुक्यात वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी ५ हजार २५, फ्रन्टलाइन वर्कर ५ हजार ६६ , १८ ते ४४ वयोगटातील ४ हजार ७०६, १८ते ३० वयोगटातील १ हजार ७३०, ३० ते ४४ वयोगट १ हजार ५३१, दुसरा डोस २२ हजार ९१० असे एकूण ८३ हजार ६५२.
---