इंटरनेटमुळे गावागावांत 'स्मार्टनेस' पोहोचणार

By admin | Published: February 26, 2016 10:59 AM2016-02-26T10:59:47+5:302016-02-26T11:00:11+5:30

महासत्तेकडे वाटचाल करणार्‍या आपल्या देशात स्मार्टनेस केवळ शहर व महानगरांपुरते र्मयादित न राहता इंटरनेटमुळे गावागावांत पोहोचणार आहे

'Smartness' will reach the villages in the village | इंटरनेटमुळे गावागावांत 'स्मार्टनेस' पोहोचणार

इंटरनेटमुळे गावागावांत 'स्मार्टनेस' पोहोचणार

Next

महासत्तेकडे वाटचाल करणार्‍या आपल्या देशात स्मार्टनेस केवळ शहर व महानगरांपुरते र्मयादित न राहता इंटरनेटमुळे गावागावांत पोहोचणार आहे. 'गावाकडच्या शाळा' आता इंटरनेट, डिजिटल स्कूल, ई-लर्निंगसारख्या उपक्रमांतून गावांना नक्कीच स्मार्ट करतील, असा विश्‍वास सुदीप हंचाटे, गणेश वाघमारे, मधुकर कांबळे, अनिरुद्ध सुर्वे, विलास नामा, आमसिद्ध तीर्थकर आणि इतर उपक्रमशील शिक्षकांना वाटतो. 
भारत हा खेड्यांचा नव्हे तर स्मार्ट खेड्यांचा देश व्हावा, ही अपेक्षा आहे. यामध्ये शाळा हा प्रमुख घटक असल्याने देशाचे भविष्य शाळेतून घडते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. जि. प. च्या शाळा आता आठवीपर्यंत होत असल्याने जबाबदारी वाढणार आहे. विशेषत: मुलींच्या आरोग्याचा विचार महत्त्वाचा आहे.
छडी लागे छमछम... ही म्हण आता कालबाह्य ठरत आहे. समाजमाध्यमांमुळे शिक्षक, विद्यार्थी आणि पालक समान पातळीवर येत आहेत. शहर, गावांप्रमाणे शिक्षकांनाही आता स्मार्ट व्हावे लागत आहे. स्मार्ट राहणे, ही आता अपेक्षा नसून गरज आहे.

 

Web Title: 'Smartness' will reach the villages in the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.