मोहराच्या गंधाने दरवळला अमराईचा परिसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:49 AM2021-02-05T06:49:25+5:302021-02-05T06:49:25+5:30
फळांचा राजा आंब्याची झाडे सध्या मोहरली आहेत. आंब्याच्या उत्पादनात मोहोर संरक्षणाला विशेष महत्त्व आहे. प्रमुख व दुय्यम पोषक द्रव्य, ...
फळांचा राजा आंब्याची झाडे सध्या मोहरली आहेत. आंब्याच्या उत्पादनात मोहोर संरक्षणाला विशेष महत्त्व आहे. प्रमुख व दुय्यम पोषक द्रव्य, संजीवक, पाण्याचे व्यवस्थापन आणि कीड, रोगांचा प्रादुर्भाव याबरोबरच निसर्गाचा लहरीपणा या सर्व गोष्टींवर आंब्याची उत्पादकता अवलंबून असते. सध्यातरी आंब्याच्या या टप्प्यात अमराईचे अनोखे दर्शन होत आहे.
तालुक्यात २५० ते ३०० हेक्टर आंबा लागवड आहे. मोहोर येणे, आंबा व्यवस्थापनात महत्त्वाचा टप्पा महत्त्वाचा ठरतो. आंब्याची फुले १० ते ४० सेंमी लांबीच्या गुच्छामध्ये येतात. प्रत्येक फुलाला पाच पाकळ्या असून त्यांची लांबी साधारणपणे ५ ते १० मि.मी. एवढी असते. आंब्याचे फूूल म्हणजेच मोहोर. या मोहराला एक प्रकारचा मंद सुवास असतो. यामुळे मधमाशा याकडे आकृष्ट होऊन फलधारणा होते.
कोट :::::::::::::
बहार व्यवस्थापनात मोहोर येण्याचा टप्पा महत्त्वाचा असतो. यावर्षी आंबा बागांची मोहोरस्थिती चांगली आहे. खत, पाणी, औषध व्यवस्थापनावर भर दिला जात आहे. त्यामुळे उच्च प्रतीचे निर्यातक्षम आंबा उत्पादन अपेक्षित आहे.
- रवींद्र फरांदे
आंबा बागायदार, गोरडवाडी
फोटो :::::::::::::::::::
गोरडवाडी येथील रवींद्र फरांदे यांच्या शेतात बहरलेली अमराई.