सोने लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या; तिघांना सोलापूर ग्रामीण पोलिसांनी केले जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2021 08:34 PM2021-11-13T20:34:43+5:302021-11-13T20:35:09+5:30

सोलापूर लोकमत बातमी

The smiles of the robbers robbing the gold; Three were arrested by Solapur Rural Police | सोने लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या; तिघांना सोलापूर ग्रामीण पोलिसांनी केले जेरबंद

सोने लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या; तिघांना सोलापूर ग्रामीण पोलिसांनी केले जेरबंद

googlenewsNext

सांगोला :  सोलापूर ग्रामीण गुन्हे प्रकटीकरण शाखा व सांगोला पोलिसांच्या संयुक्त पथकाने कौतुकास्पद कामगिरी करीत सांगोला तालुक्यातील एखतपुर- आचकदाणी रोडवर दुचाकी कारचा अपघाता झाल्याचे बनाव करून दुचाकीवरील दोघांकडून सोने लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या मुसक्‍या ४८ तासाच्या आत आवळून तिघांना जेरबंद केले. पोलिसांनी गुन्ह्यातील सुमारे ४५ लाख ८१ हजार ५२२ रुपये किमतीचे ९२५ ग्रॅम, ५६० मिली वजनाचे सोन्याचे बिस्किट( मुद्देमाल) जप्त केला अशी माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

या गुन्ह्यात पोलिसांनी दीपक प्रकाश जावडेकर (२३ रा. दिघंची ता. आटपाडी जि. सांगली), अनिल चंद्रकांत भोसले ( वय २३ रा प्रकाश नगर, गल्ली नंबर -२ अहिल्यानगर -महादेवनगर ता. मिरज जि. सांगली) व प्रशांत पाटील  (वय २१ खामकरवाडी ता. वाशी जि. उस्मानाबाद ) अशा तिघांना अटक केली आहे. दरम्यान  याबाबत,सुशांत बापुसो वाघमारे रा. दिघंची ता. आटपाडी याने १० नोव्हेंबर रोजी फिर्याद दिल्यावरून पोलिसांनी अज्ञात इसमांविरुद्ध भादंवि सं.का.क ३९४,३९७,२७९,४२७  प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या मिरज येथील इसमांकडे चौकशी केली असता त्यातील इसम हा सांगलीतील होमगार्ड असून तो व्यसनाधीन आहे तर दुसरा इलेक्ट्रिक दुकानात सेल्समन म्हणून कामास असून शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्याने कर्ज बाजारी झाला आहे. त्यामुळे त्याने मित्राच्या मदतीने सदर गुन्हा केल्याचे पोलिसांना सांगितले .सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर करीत आहे .

ही कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर पुणे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर, फौजदार ख्याजा मुजावर, श्रीकांत गायकवाड, नारायण गोयेकर, चालक समीर शेख, सांगोला पोलीस स्टेशनचे राहुल देवकाते, राहुल मोरे, सायबर सेलचे अन्वर अत्तार यांनी केली आहे.

Web Title: The smiles of the robbers robbing the gold; Three were arrested by Solapur Rural Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.