मोटारसायकल चोरांच्या आवळल्या मुसक्या; पंढरपूर गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 06:17 PM2020-10-24T18:17:09+5:302020-10-24T18:17:31+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

The smirking smiles of motorcycle thieves; Performance of Pandharpur Crime Disclosure Branch | मोटारसायकल चोरांच्या आवळल्या मुसक्या; पंढरपूर गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी

मोटारसायकल चोरांच्या आवळल्या मुसक्या; पंढरपूर गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी

Next

पंढरपूर : पंढरपूर शहर व सातारा, सांगली, पूणे इंदापूर अशा वेगवेगळया ठिकाणावरुन मोटार  सायकलची चोरी करणाºया चोरांना पकडून त्यांच्याकडून १० मोटार सायकली जप्त करण्यात आले असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिले.

पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात पत्रकार परिषदे दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम बोलत होते. यावेळी वरीष्ठ पोलिस निरिक्षक  अरूण पवार, सपोनि. नवनाथ गायकवाड, सपोनि शिवाजी करे, सपोनि राजेंद्र गाडेकर, पोहेकॉ सुजित उबाळे,  बिपीनचंद्र ढेरे,  सुरज हेंबाडे, पोना प्रसाद औटी, गणेश पवार,  अभिजीत कांबळे, शोयब पठाण,  सतिश चंदनशिवे,  मच्छींद्र राजगे, संदीप पाटील, इरफान शेख, पोकॉ सिध्दनाथ मोरे, संजय गूटाळ, समाधान माने उपस्थित होते.

पुढे विक्रम कदम म्हणाले, आकाश बामण (वय २४, रा.जुनी पेठ पंढरपूर), सोहेल अफजल बागवान (वय २२, रा.जुना कराड नाका पंढरपूर जि.सोलापूर) हे मोटार सायकल चोरून विक्री करणार असल्याची माहीती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार   सापळा रचुन पकडण्यात त्यांना पोलीसांनी पकडले. या दोघांना विश्वासात घेऊन विचारपुस केल्यास त्यांनी अशा प्रकार चोरी केलेल्या मोटार सायकली पंढरपूर शहरात लपवून ठेवल्या असून काही मोटार सायकल विक्री केल्या असल्याचे सांगीतले. त्यांचेकडुन मोटार सायकली जप्त केल्या आहेत. त्यांनी पंढरपुर शहर व सातारा, सांगली, पूणे इंदापूर अशा वेगवेगळया ठिकाणावरुन १० मोटार सायकली चोरुन आणलेल्या आहेत. त्यांची एकुण किंमत ३ लाख ७० हजार रुपये होत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली.

तीन मोबाईल चोर पकडून मोबाईल जप्त

पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीबाबत रजि.नंबर ६४०/२०२०  भादवि ३७९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. या मोबाईल चोरी प्रकरणी अहमद नजीर सय्यद (वय ३१, रा. बाळकृष्ण नगर, माढा रोड, कुर्डवाडी, ता.माढा जि सोलापूर) शहीदा महादेव तुपे (वय ३६ , रा. पानवण, ता. माण, जि सातारा), भोजलींग महादेव तुपे (वय १९, रा पानवण, ता. माण, जि. सातारा) या तिघांना पकडण्यात आले आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेला मोबाईल हस्तगत केला आहे. त्याचबरोबर शहीदा महादेव तुपे हिची घरझडती घेतली असता इतर ०३ मोबाईल हस्तगत केले आहे. त्याचप्रमाणे पंढरपूर शहरात गहाळ झालेले इतर १२ मोबाईल हस्तगत केले असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली.

Web Title: The smirking smiles of motorcycle thieves; Performance of Pandharpur Crime Disclosure Branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.