धूर वाढला, टाक्यांचा स्फोट झाला अन् डोळ्यादेखत दहा दुकाने खाक झाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:12 AM2021-03-30T04:12:14+5:302021-03-30T04:12:14+5:30

जळीतग्रस्त दुकानांमध्ये डायमंड रेडिओजचे ६१ लाख २२५ रुपये, हेअर सलूनचे ४ लाख ९५, अमर मोबाईलचे १० लाख ६९ ...

Smoke rose, tanks exploded, and ten shops were destroyed | धूर वाढला, टाक्यांचा स्फोट झाला अन् डोळ्यादेखत दहा दुकाने खाक झाली

धूर वाढला, टाक्यांचा स्फोट झाला अन् डोळ्यादेखत दहा दुकाने खाक झाली

Next

जळीतग्रस्त दुकानांमध्ये डायमंड रेडिओजचे ६१ लाख २२५ रुपये, हेअर सलूनचे ४ लाख ९५, अमर मोबाईलचे १० लाख ६९ हजार २००, चहा स्टॉल ४ लाख, हॉटेल रेणुका ९ लाख २८ हजार ४००, सत्यम शूज ८ लाख ५० हजार, जनरल स्टोअर्स १ लाख ८५ हजार, किराणा दुकान ५ लाख ८५ हजार, संगीता भोजनालय २ लाख ३१ हजार ७०० रुपये, तर श्रीपती वाघमोडे यांचे १ लाख ९० हजार रुपये असे नुकसान झाले आहे.

दहा दुकानाला लागलेल्या आगीत इलेक्ट्रिक, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, मोबाईल, मिक्सर, एलईडी, टीव्ही, फॅन, कुलर, इर्न्व्हटर, प्रिंटर, लॅपटॉप, रिपेरिंग साहित्य, फ्रिज, गॅस टाकी, चप्पल, शूज, फर्निचर, किराणा माल, पत्रा शेड व इतर साहित्य जळून एकूण १ कोटी १० लाख ३४ हजार ५४५ रुपयांचे नुकसान झाले आहे.

तर अनर्थ टळला असता

पहाटे धूर निघताना पोलीस हजर होते. सोबत पाच-पन्नास नागरिकही होते. पोलिसांनी सदाशिवनगर, अकलूज साखर कारखान्यांचे अग्निशामक बंब बोलावले. आग वाढत चालली होती. यावेळी आग विझविण्यासाठी काहीच करता येत नसल्याने हतबल होत उपस्थित पाहण्यापलीकडे काहीच करू शकत नव्हते. यातच सिलिंडरच्या स्फोटाने पुन्हा आग वाढली. तासाभराने दोन अग्निशामक बंब पोहोचले. यासाठी अग्निशमन सेवा तत्परतेने उपलब्ध झाली असती तर मोठा अनर्थ टळला असता. त्यामुळे प्रशासन यापुढील काळात तरी अग्निशमन सेवेला बळकटी देणार का? असा सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे.

Web Title: Smoke rose, tanks exploded, and ten shops were destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.