शेतातून घरी परतताना सर्पदंश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:24 AM2021-08-23T04:24:46+5:302021-08-23T04:24:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकोट : शेतातील काम संपवून सायंकाळी घरी येत असताना सर्पदंश होऊन एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकोट : शेतातील काम संपवून सायंकाळी घरी येत असताना सर्पदंश होऊन एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शनिवार, २१ ऑगस्टला सायंकाळच्या सुमारास बोरगाव (दे.) येथे घडली.
विठाबाई पंडित हत्तरके (वय ६५) असे सर्पदंशेने मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे. त्या नेहमीप्रमाणे शेताला गेल्या होत्या. संध्याकाळी घराकडे येत होत्या. वाटेत शेतातील बांध ओलांडतांना सर्पदंश झाला. तेव्हा मल्लिनाथ फुलारी यांनी स्वत:च्या जीपमधून त्या महिलेला अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत झाल्याचे घोषित केले.
रविवारी सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांच्यावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी,सून,नातवंडे असा परिवार आहे. याबाबत पंडित शिवण्णा हत्तरके यांनी पोलिसांत खबर दिली. अधिक तपास अंमलदार विपीन सुरवसे हे करत आहेत.