...तर बार्शीत कंटेन्मेंट झोनची निर्मिती करावी लागेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:21 AM2021-03-18T04:21:14+5:302021-03-18T04:21:14+5:30
मंगल कार्यालयाच्या मालकांनी कार्यालयात होणाऱ्या विवाहाची माहिती एक दिवस अगोदर नगरपालिकेला देणे बंधनकारक आहे़ पहिल्या वेळेस जर पन्नासपेक्षा ...
मंगल कार्यालयाच्या मालकांनी कार्यालयात होणाऱ्या विवाहाची माहिती एक दिवस अगोदर नगरपालिकेला देणे बंधनकारक आहे़ पहिल्या वेळेस जर पन्नासपेक्षा जास्त लोक दिसून आले तर एक हजार रुपये दंड आणि दुसऱ्यांदा असे दिसले तर दहा हजार रुपये दंड, पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा आणि एक महिन्यासाठी मंगल कार्यालय सील, अशी कारवाई केली जाणार आहे़
शहरात कपडे आणि किराणा बाजार मोठा आहे़ पालिका प्रशासनाने या दुकानदारांची नियमितपणे तपासणी करावी. त्यामध्ये व्यापारी अथवा ग्राहक जर विनामास्क दिसून आला़; दुकानात सामाजिक अंतर पाळले जात नसेल तर सुरुवातीला एक हजार रुपये दंड, दुसऱ्यांदा दोन हजार दंड, पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा आणि एक महिन्यासाठी दुकान सील आणि शॉप अॅक्ट लायोन्स निलंबित अशी कारवाई केली जाणार आहे़ ग्रामीण भागातदेखील हा नियम लागू असणार आहे़
ॲन्टिजेन टेस्टनंतरच भगवंताचे दर्शन
भगवंत मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकांची रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करूनच दर्शनासाठी सोडले जाणार आहे़ त्यासाठी प्रवेशद्वाराजवळ तपासणीसाठी स्टॉल लावला जाणार आहे़
कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू
बंद केलेली आयटीआय व पॉलिटेक्निकमधील कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू केली आहेत़ यामध्ये शिवाजी शिक्षण संस्थेच्या पॉलिटेक्निकमध्ये ७५, तर खासगी हॉस्पिटल्स व होम आयसोलेशनमध्ये ७५ असे १५० रुग्ण अॅक्टिव्ह आहेत़ पूर्वीप्रमाणेच जगदाळे मामा हॉस्पिटल, डॉ़ संजय अंधारे यांचे सुश्रुत हॉस्पिटल, कॅन्सर हॉस्पिटल, चौधरी व सोमाणी हॉस्पिटल या ठिकाणी कोविड हॉस्पिटल कार्यान्वित आहेत़
-----
...तर कंटेन्मेंट झोनची निर्मिती
सध्या जिल्ह्यात सर्वाधिक बार्शी शहर व तालुक्यात ९०० रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट केल्या जात आहेत़ ही संख्या वाढवून दोन हजार करण्यासाठी नियोजन सुरू आहे़ नागरिक व व्यापाऱ्यांनी नियमांचे पालन केले नाही तर नाइलाज म्हणून कंटेन्मेंट झोनची निर्मिती करून कडक अंमलबजावणी करण्याचा इशारा प्रांताधिकारी निकम यांनी दिला आहे़