सोशल मीडियाचा वापर समाजहितासाठी व्हावा, सायबर सुरक्षा कार्यशाळेत सोलापूरातील मान्यवरांचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 11:58 AM2018-01-29T11:58:30+5:302018-01-29T12:00:16+5:30

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे. या क्रांतीमुळे उदयास आलेल्या समाज माध्यमांद्वारे सर्वांना माहितीचे दार खुले झाले आहे; मात्र समाज माध्यमांचा वापर करताना आवश्यक सावधानता बाळगणे तितकेच महत्त्वाचे आहे

Social media should be used for social welfare, cyber security workshop, | सोशल मीडियाचा वापर समाजहितासाठी व्हावा, सायबर सुरक्षा कार्यशाळेत सोलापूरातील मान्यवरांचा सूर

सोशल मीडियाचा वापर समाजहितासाठी व्हावा, सायबर सुरक्षा कार्यशाळेत सोलापूरातील मान्यवरांचा सूर

googlenewsNext
ठळक मुद्देपोलीस आयुक्तालय सोलापूर व ग्रामीण पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जिल्हा माहिती कार्यालय, सोलापूर यांच्या समन्वयाने पोलीस आयुक्तालयातील सभागृहात प्रसारमाध्यम प्रतिनिधींसाठी सायबर जाणीव जागृती कार्यशाळासमाज माध्यमांचा वापर अविवेक वृत्तीने होऊ नये यासाठी जाणीवजागृती निर्माण करणे आवश्यक  राज्यात ४३ सायबर पोलीस ठाणे तर ४७ सायबर लॅब कार्यान्वित


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २९ :  माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे. या क्रांतीमुळे उदयास आलेल्या समाज माध्यमांद्वारे सर्वांना माहितीचे दार खुले झाले आहे; मात्र समाज माध्यमांचा वापर करताना आवश्यक सावधानता बाळगणे तितकेच महत्त्वाचे आहे. समाज माध्यमांचा वापर अविवेक वृत्तीने होऊ नये यासाठी जाणीवजागृती निर्माण करणे आवश्यक आहे. जागृतीसाठी पत्रकार व या क्षेत्रातील जाणकारांनी काम करावे. सोशल मीडियाचा वापर समाजहितासाठी व्हावा, असा सूर मान्यवरांनी सायबर सुरक्षा जाणीव जागृती कार्यशाळेत व्यक्त करण्यात आला.
पोलीस आयुक्तालय सोलापूर व ग्रामीण पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जिल्हा माहिती कार्यालय, सोलापूर यांच्या समन्वयाने पोलीस आयुक्तालयातील सभागृहात प्रसारमाध्यम प्रतिनिधींसाठी सायबर जाणीव जागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेचे उद्घाटन पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी केले. यावेळी ग्रामीण पोलीस दलाचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड, पोलीस आयुक्तालयाच्या सहायक पोलीस निरीक्षक मधुरा भास्कर, माहिती सहायक एकनाथ पोवार उपस्थित होते.
सायबर गुन्ह्याविषयी मार्गदर्शन करताना सपोनि मधुरा भास्कर म्हणाल्या, इंटरनेटने सर्वच क्षेत्रात प्रवेश केला आहे. आॅनलाईन बँकिंग, आॅनलाईन खरेदी, मेसेज पाठवणे, ई गव्हर्नन्स, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, टिष्ट्वटर, व्हिडीओ कॉल यामुळे जगातले लोक खूपच जवळ आले आहेत. इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे सायबर क्षेत्रातील गुन्हेगारांनी नवीन कल्पना शोधून लोकांचा पैसा आणि गोपनीयतेला धोका निर्माण केला आहे. याला आळा घालण्यासाठी राज्यात सायबर पोलीस स्टेशन निर्माण करण्यात आले आहेत.  इंटरनेट, समाज माध्यम वापरकर्ते यांनी या माध्यमांचा वापर करताना आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे. आपली कोणतीही गोपनीय  माहिती त्रयस्थ व्यक्तीला देऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. 
रवींद्र गायकवाड यांनी आपल्या भाषणातून सध्या बँकिंग क्षेत्रात सर्वच व्यवहार आॅनलाईन करण्यावर भर दिला जात आहे. आपले मोबाईल क्रमांक, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केले असल्याने आॅनलाईन व्यवहार करताना याबाबत अधिक जागरुक व दक्ष राहणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करताना  फसव्या जाहिरातीला आणि कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. नागरिकांनी आपली गोपनीय माहिती, एटीएम पासवर्ड कोणालाही देऊ नये. अशा प्रकारच्या माहितीची मागणी  केल्यास संबंधित बँकेत संपर्क साधावा किंवा सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंद करावी, असाही सल्ला त्यांनी दिला. 
----------------------
राज्यात ४३ सायबर पोलीस ठाणे; ४७ लॅब
 राज्यात ४३ सायबर पोलीस ठाणे तर ४७ सायबर लॅब कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सायबर कायदा अस्तित्वात आला असल्याचे सांगून  गायकवाड म्हणाले, या कायद्याच्या जनजागृतीसाठी पत्रकारांनी सतत लेखन करावे. आपली सामाजिक जबाबदारी समजून या कायद्याची जनजागृती करावी हे सांगताना त्यांनी सायबर कायद्यातील विविध कलमांची माहिती दिली.

Web Title: Social media should be used for social welfare, cyber security workshop,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.