संभाजी भिडे यांच्या सन्मानार्थ सोलापूरात मोर्चा, पोलीसांचा चोख बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:14 PM2018-03-28T12:14:51+5:302018-03-28T12:14:51+5:30
या मोर्चात पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट आदी तालुक्यातून शेकडो कार्यकर्ते उपस्थित झाले आहेत़
सोलापूर : श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या सन्मानार्थ आज सोलापूर शहरातील पार्क चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ या मोर्चात पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट आदी तालुक्यातून शेकडो कार्यकर्ते उपस्थित झाले आहेत़
कोरेगाव-भीमा दंगलीत सहभागाबद्दल संभाजी भिडे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र संभाजी भिडे यांचा या घटनेशी काहीही संबंध नाही असा दावा करत शिवप्रतिष्ठानने राज्यात ठिकठिकाणी मोर्चाचे नियोजन केले आहे़ सोलापूर शहरातील पार्क चौकातून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला़ या मोर्चात विविध घोषणा देण्यात आल्या़ दरम्यान सकाळपासूनच पार्क चौकात मोर्चासाठी शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते जमा होऊ लागले होते़ पार्क चौक हा भगवामय झाला होता़ या मोर्चात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर पोलीसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे़
या आहेत श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या मागण्या......
1. संभाजी भिडेंवरील तथाकथित खोटे गुन्हे सरकारने तत्काळ मागे घ्यावेत
2. मिलिंद एकबोटे, धनंजय देसाई यांची खोट्या आरोपातून मुक्तता करावी.
3. पुण्यातील यल्गार परिषदेतील सर्व जातीयवादी वक्त्यांवर कारवाई करावी
4. कोरेगाव-भीमा हिंसाचारात मृत्यूमुखी पडलेल्या राहुल फटांगळेला न्याय मिळावा
5. 3 जानेवारी 2018 ला करण्यात आलेल्या महाराष्ट्र बंददरम्यान झालेल्या नुकसानीची भरपाई बंद पुकारण्या?्यांकडूनच करावी
6. हिंसाचारामागे नक्षली हात आहे का?, यावर चौकशी समिती नेमावी