आंब्यासाठी जमिनीचे निर्जंतुकीकरण करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:24 AM2021-02-11T04:24:03+5:302021-02-11T04:24:03+5:30

बार्शी तालुका कृषी पदवीधर विश्वस्त मंडळ व महाकेशर आंबा बागायतदार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील आंबा ...

The soil should be disinfected for mango | आंब्यासाठी जमिनीचे निर्जंतुकीकरण करावे

आंब्यासाठी जमिनीचे निर्जंतुकीकरण करावे

Next

बार्शी तालुका कृषी पदवीधर विश्वस्त मंडळ व महाकेशर आंबा बागायतदार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील आंबा बागायतदारांसाठी कर्मवीर कृषी विद्यालयात आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते़ यावेळी आंबा संघाचे राज्य अध्यक्ष सुशील बलदवा, खजिनदार पंडितराव लोणारे, सचिव जयश्री मदने-पाटील, उपाध्यक्ष रसूल शेख, त्रिंबकराव पाथरीकर, कृषी पदवीधर मंडळाचे अध्यक्ष सयाजीराव गायकवाड, शिवाजी शिक्षण संस्थेचे संचालक दिलीप रेवडकर, अरुण देबडवार उपस्थित होते़

डॉ़ भगवानराव कापसे म्हणाले, शेतक-यांच्या उन्नतीसाठी अतिघन लागवड ५ फुट बाय १४ फुट लागवड ही सर्वात योग्य आहे़ एकरात ६६६ रोपांची लागवड करावी़ तसेच आंबा लागवड ही दक्षिण- उत्तर केल्यास फळधारणा व उत्तम दर्जाचे आंबे निर्मिती होण्यास मदत होते़

महाकेशरचे संस्थापक प्रतापसिंह परदेशी यांनी गटशेतीतून आंबा उत्पादन व विक्री व्यवस्था समजावून सांगितली. प्रास्ताविकात सयाजीराव गायकवाड यांनी केले.यावेळी बाभुळगाव येथील विश्वनाथ ननवरे यांच्या आंबा बागेत क्षेत्रीय भेट देण्यात आली़ सूत्रसंचालन जयराम गोले यांनी केले़ तर आभार नानासाहेब साखरे यांनी मानले़ कार्यक्रमासाठी भारत कदम, दत्तबाळ आरनाळे, नितीन विश्वेकर, प्रा़ पी़ आर गलांडे, पद्मराज जाधवर यांच्यासह कर्मवीर कृषी विद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

फोटो

१०बार्शी-फार्मर

ओळी

आंबा बागायतदारांसाठी आयोजित चर्चासत्रात प्रात्यक्षिक करून दाखविताना मार्गदर्शक.

Web Title: The soil should be disinfected for mango

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.