Solapur: उन्हाळी सुटीत सोलापुरातून मणिपूरला गेलेली १० मुले हिंसाचारात अडकली, सांगितला भयावर अनुभव
By शीतलकुमार कांबळे | Published: May 6, 2023 01:46 PM2023-05-06T13:46:48+5:302023-05-06T13:47:06+5:30
Solapur: मणिपूर येथील १० मुले शिक्षणासाठी सोलापुरात राहतात. उन्हाळ्याच्या सुट्टया असल्याने या मुलांची जबाबदारी असलेले सहनिवास प्रमुख अनंत अलिशे हे मुलांना घेऊन मणिपूरमध्ये गेले. मात्र, तिथे हिंसाचार सुरु असल्याने १० मुलांसह शिलसे हे तिथेच अडकले.
- शीतलकुमार कांबळे
सोलापूर - मणिपूर येथील १० मुले शिक्षणासाठी सोलापुरात राहतात. उन्हाळ्याच्या सुट्टया असल्याने या मुलांची जबाबदारी असलेले सहनिवास प्रमुख अनंत अलिशे हे मुलांना घेऊन मणिपूरमध्ये गेले. मात्र, तिथे हिंसाचार सुरु असल्याने १० मुलांसह शिलसे हे तिथेच अडकले.
सोलापूर शहरातील गांधीनाथा रंगजी हायस्कूल येथे मणिपूरमधील १० मुले शिक्षण घेत आहेत. त्यांच्या पालन पोषणाची जबाबदारी ज्ञान प्रबोधिनीने घेतली आहे. सात रस्ता येथील चैतन्य भुवन येथे ही मुले राहतात. उन्हाळ्याची सुटी असल्याने अनंत अलिशे हे मुलांना घेऊन इंफाळला गेले. तिथे त्यांच्या पालकांनी आपल्या मुलांना घरी नेले. आता तिथे हिंसाचार घडत असल्याने परिस्थीती वाईट झाली आहे.
पूर्वेकडील राज्य मणिपूरमध्ये सध्या भीषण हिंसाचार होत आहे. इंटरनेटही बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांशी संपर्क साधता येत नाही. थोड्या वेळेसाठी नेटवर्क मिळते पाचव्या मिनिटाला फोन बंद होतो. मुलांच्या घरी खायला सुद्धा मिळत नाही. घरातील धान्य संपले आहे. मुले एकाच ठिकाणी अडकून पडले असल्याचे अलिशे यांनी सांगितले.