Solapur: नई जिंदगीमधील २५ फुट पुढे आलेले घरं, दुकानांचे बांधकाम पाडले, अतिक्रमण विभागाची मोठी कारवाई
By Appasaheb.patil | Published: June 12, 2023 06:52 PM2023-06-12T18:52:58+5:302023-06-12T18:53:20+5:30
Solapur: सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने सोमवारी पुन्हा नई जिंदगीत मोठी कारवाई केली. २५ फुट पुढे अनाधिकृतपणे अतिक्रमण केलेले घरं, बांधकाम, पान टपर्या, पत्राशेड काढून टाकले. त्यामुळे सोमवारी नई जिंदगीमधील मुख्य रस्ता मोकळा दिसून येत होता.
- आप्पासाहेब पाटील
सोलापूर - सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने सोमवारी पुन्हा नई जिंदगीत मोठी कारवाई केली. २५ फुट पुढे अनाधिकृतपणे अतिक्रमण केलेले घरं, बांधकाम, पान टपर्या, पत्राशेड काढून टाकले. त्यामुळे सोमवारी नई जिंदगीमधील मुख्य रस्ता मोकळा दिसून येत होता.
नई जिंदगीमधील मुख्य रस्ता हा ८० फुट रुंदीचा आहे. या रस्त्यावर साधारणतः २० ते २५ फूट अतिक्रमण करण्यात आले होते. याबाबत तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या. प्राप्त तक्रारीची शहनिशा करून सोमवारी अतिक्रमण विभागाने कारवाई केली. जेसीबीच्या साह्याने उध्वस्त करण्यात आले. तीन पत्रा शेड, काही भिंती जमीनदोस्त करून दुकानाच्या दारासमोरील अनधिकृत फरशीकरणही काढून टाकण्यात आले. या कारवाईत एक जेसीबी, अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे वाहन, फेरी परवानाचे वाहन , सुमारे २० पोलीस कर्मचारी - अधिकारी तसेच महापालिकेचे १२ कर्मचारी असा फौज फाटा - लवाजमा तैनात करण्यात आला होता.
नागरिकांची गर्दी, लोकप्रतिनिधींनी फिरविली पाठ
अतिक्रमण विभागाने नई जिंदगीत मोठी कारवाई केली. या कारवाईवेळी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी असलेला महापालिकेच्या अधिकार्यांसह पोलिसांचा फौजफाटा पाहून लोकप्रतिनिधींनी या कारवाईस्थळाकडे पाठ फिरविल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, प्रत्येक कारवाईवेळी हस्तक्षेप करणारे लोकप्रतिनिधी सोमवारी दिसून आले नाहीत.