Solapur: दुरुस्तीची ६० टक्के कामं एप्रिलमध्येच पूर्ण, सण-उत्सवात शहराला अखंड वीज पुरवठा
By काशिनाथ वाघमारे | Published: April 13, 2023 06:36 PM2023-04-13T18:36:11+5:302023-04-13T18:36:32+5:30
Solapur: राज्यात अनेक ठिकाणी वादळासाेबत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.
- काशिनाथ वाघमारे
सोलापूर : राज्यात अनेक ठिकाणी वादळासाेबत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. गडगडाटासह पाऊस होण्याच्या शक्यतेमुळे सोलापूर शहर महावितरणने एप्रिल महिन्यातच दुरुस्तीची ६० टक्के कामे पूर्ण केल्याची माहिती शहर अभियंता आशिश मेहता यांंनी दिली.
हवामान खात्याने वर्तवलेल्या शक्यतेनंतर सोलापूर जिल्ह्यातील महावितरणची यंत्रणा सतर्क झाली. दरम्यान रविवारी रात्री अकोल्याला वादळी वा-याचा फटका बसला. या घटनेनंतर महावितरणने दुुरुस्तची कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आणली आहे. अनेक ठिकाणच्या तारा ओढून पोल सरळ केले आहेत. विद्युत तारांच्या भोवताली असलेल्या झाडाच्या फांद्या तोडण्याची मोहीम हाती घेतली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, बसवेश्वर जयंती पार्श्वभूमीवर वीज दुरुस्तीची कामे वेगाने पूर्ण केली जात आहेत. गुरुवारी महापौर बंगला आणि जुनी गिरणी परिसरसह पार्क चौकातील मिरवणुक दरम्यानची अडथळे दुर करण्याची कामे हाती घेतली.
वीज वापर ४२ दस लक्ष युनीहटून अधिक
सध्या शहरात वीजेचा वापर वाढला आहे. एप्रिल महिन्यात शहराचा एकूण वापर ४२ दस लक्ष युनिट पेक्षा अधिक असून मे महिन्यात वापर आणखी वाढणार असल्याचे शहर अभियंता मेहता यांनी सांगितले. या शिवाय शहरातील दोनही औद्योगीक वसाहतीला आवश्यक तेवढा वीज पुरवठा होत असल्याचेही त्यांनरी सांगितले.
केवळ दोन तास
सध्या परीक्षांचा काळ असून शहरातील शाळा-महाविद्यालय परिसरातील कामे थांबवली आहेत. केवळ बुधवारी सुटीच्या दिवसी ३३ केव्हीची लाईन बंद ठेवून दुरुस्तीची कामे केली जात आहेत. एरव्ही गरज वाटली तर केवळ अर्धा तास वीज पुरवठा करुन संबंधीत भागातील दुरुस्तीची कामे केली जात आहेत.