Solapur: शेतीच्या पाण्याच्या कारणावरून एकास शिवीगाळ, दोघाविरुद्ध गुन्हा दाखल
By रवींद्र देशमुख | Updated: July 18, 2024 19:41 IST2024-07-18T19:40:25+5:302024-07-18T19:41:40+5:30
Solapur News: कचरेवाडी येथे शेतीच्या पाण्याच्या कारणावरून एकास शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Solapur: शेतीच्या पाण्याच्या कारणावरून एकास शिवीगाळ, दोघाविरुद्ध गुन्हा दाखल
- रवींद्र देशमुख
सोलापूर/मंगळवेढा - कचरेवाडी येथे शेतीच्या पाण्याच्या कारणावरून एकास शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी आनंदा गायकवाड यांनी फिर्यादीवरून तुकाराम काळुंगे व बाजीराव गवळी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी हे कचरेवाडी येथील एका शेतमालकाकडे शेतात कामास आहेत. वरील दोघे आरोपी हे शेतालगत असून सकाळी फिर्यादीच्या शेताच्या बांधावर आरोपीने शेतीच्या पाण्याच्या कारणावरून शिवगाळी, दमदाटी केली असल्याचे दिलेल्या तक्रारीत म्हटले असून याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.