Solapur: हैदराबादच्या भाविकाने विठ्ठलाला अर्पण केला पाच पदरी सोन्याचा हार
By रवींद्र देशमुख | Updated: May 16, 2024 17:52 IST2024-05-16T17:52:11+5:302024-05-16T17:52:27+5:30
Solapur News:हैदराबाद येथील विजया नायडू या दानशूर महिला भाविकाने पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती (पंढरपूर) यांना १३० ग्रॅम पदक असलेले सोन्याचे मणिहार अर्पण करून भक्तीतील गोडवा वाढवला. या सुवर्णहाराची किंमत ८ लाख ३६ हजार रुपये आहे.

Solapur: हैदराबादच्या भाविकाने विठ्ठलाला अर्पण केला पाच पदरी सोन्याचा हार
- रविंद्र देशमुख
सोलापूर - हैदराबाद येथील विजया नायडू या दानशूर महिला भाविकाने पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती (पंढरपूर) यांना १३० ग्रॅम पदक असलेले सोन्याचे मणिहार अर्पण करून भक्तीतील गोडवा वाढवला. या सुवर्णहाराची किंमत ८ लाख ३६ हजार रुपये आहे.
या दानशूर भाविकांचा मंदिर समिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते उपरणे व दैनंदिनी देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी नायडू यांचे कुटुंबीय उपस्थित होते. यापूर्वीही अनेक प्रांतातून आलेल्या भाविकांनी आपली इच्छपूर्ती झाल्यानंतर अशाप्रकारच्या सुवर्णवस्तू, रक्कम देऊन भक्ती व्यक्त करताहेत.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या खजिन्यामध्ये सोन्याच्या दागदागिन्यांची भर पडू लागली आहे. विठ्ठलाची महती जगभर पसरली आहे. विविध देश-विदेशातून भाविक मोठ्या संख्येने पंढरपूरला येत असतात.