सोलापूर : रंगभवन चौकात शेतकऱ्याने विकले दोनशे रुपयांमध्ये ५० किलो कांदे !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 09:30 PM2023-02-21T21:30:35+5:302023-02-21T21:31:34+5:30

राज्यात अनेक ठिकाणी कांद्याला कमी दर मिळत आहे.

Solapur A farmer sold 50 kg of onions for two hundred rupees in Rangbhavan Chowk | सोलापूर : रंगभवन चौकात शेतकऱ्याने विकले दोनशे रुपयांमध्ये ५० किलो कांदे !

सोलापूर : रंगभवन चौकात शेतकऱ्याने विकले दोनशे रुपयांमध्ये ५० किलो कांदे !

googlenewsNext

शीतलकुमार कांबळे
सोलापूर : राज्यात अनेक ठिकाणी कांद्याला कमी दर मिळत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (मार्केट यार्ड) जाऊन अडत, हमाली, तोलाई यासाठी पैसै भरावे लागतात. त्यामुळे एका शेतकऱ्याने रंगभवन चौकात उभे राहात २०० रुपयांना ५० किलो म्हणजेच चार रुपये दराने कांदा विकला.

फक्त २०० रुपयांना कांद्याचे ५० किलोचे पोते मिळत असल्याने लोकांनी खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. अनेकांनी एवढ्या स्वस्त का विकत आहात, असा प्रतिप्रश्नही केला. काही वेळातच शेतकऱ्याचा सगळा कांदा विकला गेला.

कांद्याला कमी भाव मिळत आहे. तिथे जाऊन हमाली, तोलाईला खर्च करावा लागतो. त्यापेक्षा शहरात रस्त्यावर विकण्याचा पर्याय स्वीकारला. आम्हाला चार पैसै मिळावे तसेच सामान्य लोकांना याचा फायदा व्हावा यासाठी रंगभवन चौकात २०० रुपयाला ५० किलोचे पोते विकल्याचे दर्गनहळ्ली (ता. अक्कलकोट) येथील शेतकरी फिरोज बागवान यांनी सांगितले.

Web Title: Solapur A farmer sold 50 kg of onions for two hundred rupees in Rangbhavan Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.