Solapur: कळपातील शेळ्या चोरणाऱ्याला मेंढपाळांनी दिले पकडून, पोलिसांच्या केले हवाली
By शीतलकुमार कांबळे | Published: October 28, 2023 07:04 PM2023-10-28T19:04:53+5:302023-10-28T19:05:14+5:30
Solapur News: एसआरएफीएच्या मोकळ्या जागेत रात्र घालवण्यासाठी थांबलेल्या मेंढपाळाच्या कळपातून शेळी चोरणाऱ्या चोरट्यास मेंढपाळानी शिताफीने पकडले. ही घटना शुक्रवारच्या मध्यरात्री घडली.
- शीतलकुमार कांबळे
सोलापूर - एसआरएफीएच्या मोकळ्या जागेत रात्र घालवण्यासाठी थांबलेल्या मेंढपाळाच्या कळपातून शेळी चोरणाऱ्या चोरट्यास मेंढपाळानी शिताफीने पकडले. ही घटना शुक्रवारच्या मध्यरात्री घडली. त्याला मेंढपाळांनी विजापूर नाका पोलिसांच्या स्वाधीन केले.
यल्लप्पा बसण्णा मादगुंडी (रा. रेल्वे स्टेशन) असे चोरट्याचे नाव आहे. यातील अनिल गोविंद काळे (वय २०, रा. इंटयीगाळ विजापूर) हे मेंढपाळ त्यांच्या शेळ्या- मेंढ्या घेऊन सोलापूर परिसरात चारण्यासाठी आले होते. गुरूवारी सायंकाळी सातच्या सुमारास सोरेगावजवळील एसआरपीएफच्या मोकळ्या त्यांनी त्यांच्या मेंढ्यासह मुक्काम केला. शुक्रवारी मध्यरात्री एकच्या सुमारास यल्लप्पा बसण्णा मादगुंडी (रा. रेल्वे स्टेशन) हा आला. त्याने फिर्यादीच्या शेळ्या आणि मेंढ्यांचा कळपातील काळ्या रंगाची शेळी चोरून नेत होता.
शेळ्याच्या कळपाजवळ कोणीतरी अज्ञात व्यक्ती आल्याची चाहूल लागून फिर्यादी अनिल काळे जागे झाले. त्यांना अनोळखी व्यक्ती शेळी चोरून नेत असल्याचे लक्षात येताच, त्यांनी त्यास पकडून पोलिसांच्या हवाली केले.