Solapur: हळद समजून तरुणीनं प्राशन केली, सडा मारण्याची विषारी पावडर
By रवींद्र देशमुख | Updated: July 18, 2024 19:36 IST2024-07-18T19:35:48+5:302024-07-18T19:36:25+5:30
Solapur News: हळद समजून दुधामध्ये अंगणात सडा मारण्यासाठी वापरली जाणारी विषारी पिवळी पावडर प्राशन केल्यानं तरुणीला शासकीय रुग्णालयात तातडीने उपचारासाठी दाखल करावे लागले. एमआयडीसी परिसरातील विनायक नगरात गुरुवारी ही घटना घडली.

Solapur: हळद समजून तरुणीनं प्राशन केली, सडा मारण्याची विषारी पावडर
- रवींद्र देशमुख
सोलापूर : हळद समजून दुधामध्ये अंगणात सडा मारण्यासाठी वापरली जाणारी विषारी पिवळी पावडर प्राशन केल्यानं तरुणीला शासकीय रुग्णालयात तातडीने उपचारासाठी दाखल करावे लागले. एमआयडीसी परिसरातील विनायक नगरात गुरुवारी ही घटना घडली. दिक्षा मकरंद सर्वगोड (वय १९, रा. विनायक नगर, एमआयडीसी, सोलापूर) असे या तरुणीचे नाव आहे.
यातील तरुणीने राहत्या घरी घसा साफ होण्याच्या दृष्टीने दुधामध्ये हळद घालून पिण्यासाठी चुकून घरी सडा मारण्यासाठी वापरली जाणारी पिवळी पावडर दुधात मिसळली आणि प्राशन केली. काही वेळानं त्रास होऊ लागल्यानं घरच्यांच्या लक्षात ही बाब आली. तातडीने तिला सासू वैशाली सर्वगोड यांनी येथील शासकीय रुग्णालयात हलवले. तिच्यावर उपचार सुरु असून, ती शुद्धीवर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.