सोलापूर आगारात सुरक्षितता मोहिम सुरू; एस. टी. कर्मचाºयांनी केले हेल्मेटला जवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 01:07 PM2019-01-12T13:07:17+5:302019-01-12T13:09:04+5:30
सोलापूर : हेल्मेट सक्तीबाबत वाहनधारकांतून गांभीर्यच दाखवले जात नाही. मात्र दिवसेंदिवस वाढणारे अपघात आणि त्यात बळी जाणाºया नागरिकांची संख्या ...
सोलापूर : हेल्मेट सक्तीबाबत वाहनधारकांतून गांभीर्यच दाखवले जात नाही. मात्र दिवसेंदिवस वाढणारे अपघात आणि त्यात बळी जाणाºया नागरिकांची संख्या पाहिली असता हेल्मेट सक्तीबाबत कठोर पावले उचलण्याची गरज आहे़ हेल्मेटबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी परिवहन विभागाच्या मध्यस्थीने श्रीराम क्रीडा संस्थेतर्फे प्राथमिक तत्त्वावर ५० एसटी आगारातील कर्मचाºयांना हेल्मेटचे वाटप करून सुरक्षितता मोहिमेस प्रारंभ झाला.
राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार संपूर्ण देशात दरवर्षी जानेवारी महिन्याच्या सुरुवातीस सुरक्षितता मोहीम साजरी करण्यात येत असते़ रस्ते वाहतुकीस सुरक्षित प्रवास हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे़ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हे प्रवाशांची सुरक्षित सेवा करणारे महामंडळ आहे़ महामंडळाचा दावा प्रबळ करण्यासाठी सुरक्षितता मोहीम राबविण्यात येत आहे़ या मोहिमेचे उद्घाटन सहा़ प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश जाधव, सहा़ मोटार वाहन निरीक्षक तानाजी धुमाळ, वाहतूक नियंत्रक मनोज मुदलियार यांच्या हस्ते करण्यात आले़ अध्यक्षस्थानी यंत्र अभियंता चिकोर्डे होते.
एसटी बसच्या कर्मचाºयांनी वाहन चालविताना ते सुरक्षित राहावे म्हणून त्याला हेल्मेट भेट दिले. तसेच जनतेमध्ये हेल्मेट वापरण्याबद्दल जनजागृती निर्माण करायची असल्यास प्रथम आपण स्वत: हेल्मेट वापरले पाहिजे, हा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे, असे मत सहा़ प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश जाधव यांनी केले़ प्रास्ताविक सहा़ कार्यशाळा अधीक्षक कोळी यांनी केले़ या मोहिमेबद्दलची सविस्तर माहिती वरिष्ठ आगार व्यवस्थापक मुकुंद दळवी यांनी दिली.
सूत्रसंचालन वरिष्ठ लिपिक तारासिंग राठोड तर आभार सहायक प्रवीण राठोड यांनी मानले़ या कार्यक्रमास एसटी महामंडळातील सर्व पर्यवेक्षक, युनियन प्रतिनिधी, चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते़