Solapur: दुचाकीवरून जाताना हृदयविकारचा झटका आल्याने अक्कलकोटच्या शिक्षकाचा मृत्यू
By Appasaheb.patil | Updated: May 8, 2024 17:13 IST2024-05-08T17:13:26+5:302024-05-08T17:13:46+5:30
Solapur News: हंजगी (ता.अक्कलकोट) येथील जिवाजीराव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वाल्मीकी बालक प्राथमिक आश्रम शाळा हंजगी येथील सहशिक्षक चनबसप्पा तुकशेट्टी (वय ४७) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.

Solapur: दुचाकीवरून जाताना हृदयविकारचा झटका आल्याने अक्कलकोटच्या शिक्षकाचा मृत्यू
- आप्पासाहेब पाटील
अक्कलकोट - हंजगी (ता.अक्कलकोट) येथील जिवाजीराव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वाल्मीकी बालक प्राथमिक आश्रम शाळा हंजगी येथील सहशिक्षक चनबसप्पा तुकशेट्टी (वय ४७) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. मोटारसायकलवरून जाताना अचानक झटका आल्याने त्याचा दुदैवी मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. ही घटना अक्कलकोट येथे बुधवारी सकाळच्या सुमारास घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चनबसप्पा तुकशेट्टी हे सकाळी घरी आंघोळ करुन समता नगर येथून अक्कलकोट शहरात जात असताना चालत्या मोटार सायकलवरच तुकशेट्टी यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. दरम्यान, चालत्या मोटारसायकलवरून ते खाली कोसळले. तेव्हा परिसरातील नागरिकांनी पाहून तात्काळ गाडीत घालून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर डॉक्टर यांनी तपासून मृत घोषित केले. त्यांच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे किणी पंचक्रोशीती हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, तीन भाऊ असा परिवार आहे.