Solapur: दीडशे ग्रामपंचायत हद्दीत तीन नोव्हेंबर पासून मद्य विक्रीस मनाई, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
By बाळकृष्ण दोड्डी | Published: October 28, 2023 05:57 PM2023-10-28T17:57:27+5:302023-10-28T17:58:51+5:30
Solapur News: सोलापूर जिल्ह्यात १०९ ग्रामपंचायत मध्ये सार्वत्रिक निवडणूक तसेच ४३ ग्रामपंचायत मध्ये पोटनिवडणूक सुरू असून यासाठी ५ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या १५२ गावांमध्ये ३ नोव्हेंबर सायंकाळी सहा पासून मद्य विक्रीस मनाई केली आहे.
- बाळकृष्ण दोड्डी
सोलापूर - जिल्ह्यात १०९ ग्रामपंचायत मध्ये सार्वत्रिक निवडणूक तसेच ४३ ग्रामपंचायत मध्ये पोटनिवडणूक सुरू असून यासाठी ५ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या १५२ गावांमध्ये ३ नोव्हेंबर सायंकाळी सहा पासून मद्य विक्रीस मनाई केली आहे. पाच नोव्हेंबर पर्यंत मद्यविक्री बंद ठेवण्याची सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली आहे.
६ नोव्हेंबरला तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. या दिवशी तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी मद्य विक्री पूर्ण बंद ठेवण्याचे आदेश देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील अक्कलकोट, बार्शी, करमाळा, माढा, माळशिरस, मंगळवेढा, सांगोला, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ, पंढरपूर तालुक्यांतील ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका सुरू आहेत. शांतता राखण्याच्या दृष्टीकोनातून मद्य विक्री बंद ठेवण्याचे आदेश आहेत. आदेशाचे उल्लघंन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.