Solapur: खातेदारांना बँकेचा मॅसेज; कटे, फटे, गंदे, खराब नोटा आता बँकेतून बदलून मिळणार
By Appasaheb.patil | Published: March 1, 2023 09:26 PM2023-03-01T21:26:07+5:302023-03-01T21:26:51+5:30
Solapur: जर तुमच्याकडे कटे, फटे, गंदे व खराब नोटा असतील किंवा कुठेही या नोटा घेत नसेल तर आता तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. तुम्हाला या नोटांऐवजी चांगली नोट मिळू शकते. त्यासाठी आरबीआयनं नुकताच एक नियम बनविला आहे
- आप्पासाहेब पाटील
सोलापूर - जर तुमच्याकडे कटे, फटे, गंदे व खराब नोटा असतील किंवा कुठेही या नोटा घेत नसेल तर आता तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. तुम्हाला या नोटांऐवजी चांगली नोट मिळू शकते. त्यासाठी आरबीआयनं नुकताच एक नियम बनविला आहे. एवढेच नव्हे तर सर्व मोबाईल धारकांना त्यासंदर्भातील संदेश पाठविण्यात आला. याबाबतची माहिती आता सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकच्या २०१७ च्या एक्सचेंज करेंसी नोट नियमांनुसार, जर तुमच्याकडे फाटलेल्या नोटा असतील तर त्या तुम्ही सहजपणे बदलू शकता. कुठलीही सरकारी बँक नोटा बदलण्यासाठी नकार देऊ शकत नाही. अशा नोटा बँकेला बदलून द्याव्या लागतात. त्यास मनाई करु शकत नाहीत असेही सोशल मिडियावर पोस्ट शेअर होत आहे अन् ते खरेही आहे. अनेकदा विविध कारणांमुळे आपल्या खिशात असलेल्या नोटा खराब, रंग अथवा गहाण झालेल्या असतात. त्या बदलून कशी मिळतात त्याबाबतची माहिती अनेकांना माहिती नसते. त्यामुळे अनेकजण त्या नोटा घरातच ठेवतात. शिवाय घरातील लहान मुलांना पैशाच्या नोटाबाबत माहिती नसते त्यामुळे लहान मुलंही नोटा फाडतात. आता फाटलेल्या, गंदे, कट झालेल्या नोटा सहज बदलून मिळणार आहे, त्यासंदर्भातील माहिती सोशल मिडियावर व्हायरत होत आहे.
कोणतीही बँक एटीएममधून फाटलेल्या नोटा बदलण्यास नकार देऊ शकत नाही. तसेच, असे असतानाही बँकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास बँक कर्मचाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. ग्राहकाच्या तक्रारीच्या आधारे बँकेला १० हजारांपर्यंतचे नुकसानही भरावे लागू शकते असेही साेशल मिडियावर सांगण्यात आले आहे.