सोलापूर, बार्शी बाजार समिती निवडणूक कार्यक्रम प्राधिकरणाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 12:10 PM2018-05-17T12:10:41+5:302018-05-17T12:10:41+5:30

बिगूल लवकरच वाजणार : सोलापूर, बार्शीसाठी २५ जूनला मतदानाचा प्रस्ताव

Solapur, Barshi Bazar Committee Election Program Authority | सोलापूर, बार्शी बाजार समिती निवडणूक कार्यक्रम प्राधिकरणाकडे

सोलापूर, बार्शी बाजार समिती निवडणूक कार्यक्रम प्राधिकरणाकडे

googlenewsNext
ठळक मुद्दे२३ मे रोजी निवडणूक जाहीर होण्याची शक्यता२५ जूनला मतदान तर २७ जूनला मतमोजणी ?शेतकºयांना मतदानाचा अधिकार मिळाला

सोलापूर : सोलापूर आणि बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रस्तावित निवडणूक कार्यक्रम जिल्हा निवडणूक कार्यालयाने सहकार निवडणूक प्राधिकरणाकडे सादर केला आहे. यानुसार २३ मे रोजी निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. २५ जूनला मतदान तर २७ जूनला मतमोजणी करावी, असे सूचित करण्यात आले आहे. प्राधिकरणाकडून निर्देश आल्यानंतर जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करतील, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ यांनी सांगितले. 

सोलापूर आणि बार्शी बाजार समितीच्या निवडणुकीचा वाद उच्च न्यायालयात पोहोचला होता. न्यायालयाने प्राधिकरणाकडून प्रस्तावित कार्यक्रमही मागवून घेतला होता. प्राधिकरणाने जिल्हा प्रशासनाकडून प्रस्ताव मागवून घेतला. या प्रस्तावानुसार १४ मे रोजी सोलापूर आणि बार्शी बाजार समितीची अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. यंदा बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकºयांना मतदानाचा अधिकार मिळाला आहे.

निवडणूक कार्यालयाने दोन्ही बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम सहकार निवडणूक प्राधिकरणाकडे सादर केल्यामुळे आता निवडणूक होईलच, अशी शक्यता वर्तविली जात आहे. जिल्हाधिकाºयांच्या नेतृत्वाखालीच निवडणूक होईल. सोलापूर बाजार समितीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक आणि त्यांना सहायक म्हणून उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूरच्या तहसीलदारांचा समावेश असेल. बार्शीसाठी प्रांताधिकारी शिवाजी जगताप आणि सहायक म्हणून बार्शीचे तहसीलदार ऋषिकेत शेळके काम पाहतील. 

करमाळ्यासाठी काम सुरू
च्करमाळा बाजार समितीच्या संचालक मंडळाची वाढीव मुदत २२ मे रोजी संपत आहे. या पार्श्वभूमीवर करमाळा बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील मतदार यादी तयार करण्याचे आदेश तहसीलदारांना देण्यात आले आहेत. या बाजार समितीसाठी ६० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सुरुवातीला बाजार समितीने हा खर्च झेपणार नाही, असे पत्र दिले होते. परंतु, आता निम्मा ३० लाख रुपये खर्च करु. उर्वरित शासनाने करावा, असे पत्र दिले आहे. 

मतपत्रिकेचा वापर होणार
च्या निवडणुकांसाठी ईव्हीएम मशीन नव्हे तर पत्रिकेचा वापर होणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सतीश धुमाळ यांनी स्पष्ट केले. या कामात शासकीय कर्मचाºयांची मदत घेतली जाईल.

दोन्ही बाजार समित्यांसाठी समान तारखा
च्निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे २३ मे, उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २३ मे ते २८ मे, उमेदवारी अर्ज छाननी २९ मे, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख १२ जून, मतदान २५ जून आणि मतमोजणी २७ जून. 

Web Title: Solapur, Barshi Bazar Committee Election Program Authority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.