शेतकºयांचे पैसे अडकविणाºया २५ व्यापाºयांचे परवाने रद्द, सोलापूर बाजार समितीचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 01:11 PM2018-08-02T13:11:45+5:302018-08-02T13:13:04+5:30
सोलापूर : शेतकºयांचे पैसे अडकविणे व बाजार समितीचा सेस थकविणाºया २५ व्यापाºयांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय सोलापूर बाजार समितीने घेतला आहे. यापैकी काहींनी शेतकºयांचे पैसे चुकते केले तर पुन्हा त्यांना परवाने देता येणार नाहीत, असा पणन मंडळाचा नियम असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
सोमवारी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाची बैठक सभापती दिलीप माने यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत ४१ विषयांवर चर्चा होऊन मंजुरी देण्यात आली. मागील ५-६ महिन्यांपासून अनेक अडते (व्यापारी) शेतकºयांचा माल विक्री करतात परंतु पैसे देत नाहीत, अशा तक्रारी वाढल्या आहेत. यापैकी काही शेतकºयांनी बाजार समिती प्रशासक व सध्याच्या संचालक मंडळाकडे तक्रारी केल्या होत्या. काही व्यापाºयांनी शेतकºयांना दिलेले धनादेश वटले नाहीत.
शेतकºयांनी व्यापारी व बाजार समिती प्रशासनाकडे वारंवार हेलपाटे मारूनही काही उपयोग झाला नाही. यापैकी काही व्यापाºयांनी बाजार समितीचा सेसही भरला नाही. यामुळे नोटिसा दिल्यानंतरही दखल न घेणाºया व्यापाºयांचे परवानेच रद्द करण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला.
मंत्री, आमदारही करतात फोन
- सोलापूर बाजार समितीमध्ये लातूर, उस्मानाबाद, अहमदनगर, बीड, पुणे, सांगली, सातारा व अन्य जिल्ह्यातील शेतकरी माल विक्रीसाठी आणतात. अधिक दराने मालाची विक्री करतो, अशी बतावणी करून शेतकºयांना आपल्याकडे माल टाकायला लावले जाते व त्यांना धनादेश देऊन फसविले जाते. असे शेतकरी त्या-त्या भागातील पदाधिकाºयांमार्फत सोलापूर बाजार समितीला फोन करून पैसे देण्यास सांगतात. राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे, आमदार सुरेश धस व अन्य आमदारांनीही शेतकºयांचे पैसे देण्यासाठी फोन केले होते. तरीही व्यापाºयांनी जुमानले नसल्याचे सांगण्यात आले.
यांचे केले परवाने रद्द
- तुकाराम पाटील, ज्ञानेश्वर पाटील, रविकांत पाटील, अविनाश पाटील, एम. आय. कल्याणी, संतोष बणजगोळे, सुरेश जाधव-पाटील, जिलाणी कल्याणी, धानप्पा दहिटणे, नसीर अहमद खलिफा, अनिल हेबळे, म. कैफ ट्रेडर्स, अमन कल्याणी, छोटूभाई बागवान, ताजबाबा ट्रेडिंग कंपनी, कल्याणी ट्रेडर्स, कैलास पौळ, पैलवान ट्रेडर्स, बाबा ट्रेडर्स, काका ट्रेडर्स, आसिफ ट्रेडर्स, रूद्रेश पाटील, महेश बिराजदार, इब्राहीम बागवान, एस. एम. ट्रेडर्स आदी.
शेतकºयांची बाजार समिती आहे, त्यांचीच अडवणूक होत असेल तर नियमाप्रमाणे कारवाई होणार. आमच्याकडे आलेल्या तक्रारीनंतर अनेक व्यापाºयांनी पैसे देण्यास सुरुवात केली आहे.
- दिलीप माने,
सभापती, सोलापूर बाजार समिती