Solapur: मोठी बातमी; सोलापूरकरांच्या पाण्याची चिंता मिटली; उजनी येणार ४८ तासात 'प्लस'मध्ये
By Appasaheb.patil | Published: July 30, 2023 04:51 PM2023-07-30T16:51:10+5:302023-07-30T16:52:34+5:30
Solapur: सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी धरणाच्या पाणीपातळी दिवसेंदिवस वाढ होत आहे. वजा ३४ टक्क्यांवर गेलेले उजनी धरण रविवारी वजा ४ टक्क्यांवर आले आहे.
- आप्पासाहेब पाटील
सोलापूर - सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी धरणाच्या पाणीपातळी दिवसेंदिवस वाढ होत आहे. वजा ३४ टक्क्यांवर गेलेले उजनी धरण रविवारी वजा ४ टक्क्यांवर आले आहे. येत्या ४८ तासात उजनी धरण प्लसमध्ये येणार असल्याने सोलापूरकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे.
सध्या उजनी धरणात पुणे जिल्ह्यातील खडकवासला, मुळा-मुठा धरणातून पाणी येत आहे. उजनीत १५ हजार ३८५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. शिवाय उजनी धरण परिसरात पाऊस चांगला पडत असल्याने धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. सोलापूर शहराला उजनी धरणातून पाणीपुरवठा होतो. उजनीतील पाणीपातळी कमी झाल्याने महापालिकेने धरणावर दुबार पंपींग सुरू करून पाण्याचा उपसा करीत होते. मात्र आता धरणात पाणीपातळी वाढल्याने दुबार पंपींग बंद केला आहे. सध्या शहरातील नागरिकांना सहा दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. विद्युत पुरवठा खंडित व अन्य कारणामुळे विस्कळीत होणारा पाणीपुरवठा सध्या सुरळीत सुूरू असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे म्हणणे आहे.