सोलापूरात शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने नोटाबंदीचे वर्षश्राध्द, धरणे आंदोलन व निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 12:23 PM2017-11-08T12:23:05+5:302017-11-08T12:23:20+5:30
सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने ८ नोव्हेंबर हा दिवस काळादिवस म्हणून पाळण्यात येत आहे़ यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नोटबंदीचे वर्षश्राध्द, धरणे आंदोलन व निर्दशने करण्यात आली़
आॅनलाइन लोकमत सोलापूऱ
सोलापूर दि ८ : सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने ८ नोव्हेंबर हा दिवस काळादिवस म्हणून पाळण्यात येत आहे़ यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नोटबंदीचे वर्षश्राध्द, धरणे आंदोलन व निर्दशने करण्यात आली़
यावेळी आ प्रणिती शिंदे, नगरसेवक चेतन नरोटे, शहराध्यक्ष प्रकाश वाले, माजी महापौर संजय हेमगड्डी, हनुमंतू सायबोळू, विनोद भोसले, उपेंद्र ठकार, हेमा चिंचोळकर, सुमन जाधव, राजन कामत, रॉकी बंगाळे, अंबादास गुत्तीकोंडा, राजकुमार गोयल आदी शहर काँग्रेस कमिटीचे सदस्य व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते़
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताच्या इतिहासात मोहम्मद बिन तुघलकाप्रमाणे ओळखले जातील इतके या नोटबंदीचे दुष्परिणाम झाले आहेत़ या निर्णयानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत पैसे काढण्यासाठी बँकेच्या रांगेत उभे असताना देशात बहुतांश नागरिकांचा मृत्यू झाला़ ही दुखद बाब आहे़ तरीही सरकार भारतीय व्यवस्थेवर केलेल्या या सर्जिकल स्टाईकला फार मोठी उपलब्धी मानत असल्याचा आरोप काँग्रेसच्यावतीने करण्यात आला आहे़ काळापैसा कुठे गेला़़़नवीन नोटा छापण्याच्या रूपये २५ हजार ३९१ कोटी खर्च जनतेचा बोकांडी का़़़भारत देश डिजिटल अर्थव्यवस्था झाला का़़़आतंकवाद, दहशतवाद, नक्षलवाद संपला का़़़बनावट जालीम नोटा बंद झाल्या का़़़ यासह अनेक प्रश्न यावेळी काँग्रेसच्यावतीने भाजप सरकारला विचारण्यात आली़
यावेळी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली़ यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते़