केशकर्तनाचे दर वाढले, पण दाढीचे दर मात्र 'जैसे थे'
By Appasaheb.patil | Published: March 5, 2023 09:59 PM2023-03-05T21:59:33+5:302023-03-05T21:59:33+5:30
नाभिक संघाच्या बैठकीत निर्णय
आप्पासाहेब पाटील, साेलापूर: सद्य परिस्थिती लक्षात घेउन ग्राहकांनाही दिलासा मिळावा या हेतूने दाढीचे दर स्थिर पुर्वीचेच ठेवले असून फक्त १०० कटिंगच्या दरात वाढ सुचविण्यात आली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत दरवाढीचा निर्णय नाभिक दुकानदार संघाच्या बैठकीत झाल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष अभयकुमार कांती यांनी लोकमत शी बोलताना सांगितले.
संत सेना नाभिक दुकानदार संघ सेवाभावी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा सोलापूर ऑफिसर क्लब समोरील इंपिरियल हॉल मध्ये अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. गत पन्नास वर्षांहूनही अधिक काळापासून बिनविरोध निवड करण्याची परंपरा यंदाही कायम राहिली. मनोहर क्षीरसागर, चंद्रमोळी तमनुर, पंडित येळगे, संजय जोगीपेटकर, आनंद सिंगराल आदी समाजातील ज्येष्ठ धुरिणांच्या उपस्थितीत आणि देखरेखीखाली एकमताने नूतन पदाधिकारी निवडण्यात आले.
ग्राहकांना उत्तम सेवा देता यावी म्हणून करागिरांसाठी मुंबई, पुणे, बेंगलोर इ. ठिकाणच्या तज्ञांचे सेमिनार आयोजित केले जातील, दुकानदार बंधूसाठी गृहनिर्माण योजनेचा लाभ मिळवून देणे व तसेच संस्थेला कायम स्वरुपी कार्यालय असावे यासाठी आम्ही सर्व ते प्रयत्न करू." असा निर्धार त्यांनी कांती यांनी व्यक्त केला.
असे आहेत नूतन पदाधिकारी...
अध्यक्ष- अभयकुमार काती, उपाध्यक्ष- शेखर कोडापूरे, सचिव- मोहन जमदाडे, खजिनदार- शिवकुमार हडपद
सदस्या- मुरली पदिला, गोपाल नडीगुडू राम राऊत, राजू हडपद