दहशतवादी हल्ला रोखण्यासाठी सोलापूर शहर पोलीस सक्षम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 10:30 AM2018-11-26T10:30:00+5:302018-11-26T10:31:33+5:30

२६/११ हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण : वर्षभरात २२ मॉक ड्रील्स; गर्दीच्या ठिकाणी वॉच

Solapur city police capable of preventing terrorist attacks | दहशतवादी हल्ला रोखण्यासाठी सोलापूर शहर पोलीस सक्षम

दहशतवादी हल्ला रोखण्यासाठी सोलापूर शहर पोलीस सक्षम

googlenewsNext
ठळक मुद्देपोलीस आयुक्तालयात एक एटीएस व क्युआरटी ही दोन पथके कार्यरत वर्षभरात २२ प्रात्यक्षिके (मॉक ड्रिल) घेण्यात आली सोलापुरात सुरक्षा व्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलीस आयुक्तालयाच्या वतीने नेहमी प्रयत्न

संताजी शिंदे
सोलापूर : संपूर्ण देशाला हादरवून सोडणाºया २६ नोव्हेंबर २00८ च्या दहशतवादी हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. मुंबईसारखा प्रकार घडल्यास शहरात प्रत्युत्तर देऊन दहशतवादी हल्ल्याचा बिमोड करण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने वर्षभरात २२ प्रात्यक्षिके (मॉक ड्रिल) घेण्यात आली आहेत. 

मुंबईत झालेला दहशतवादी हल्ला आठवला की आजही अंगाचा थरकाप उडतो.  या घटनेला दहा वर्षे पूर्ण होताहेत.  या थरार उडवणाºया घटनेमतध्ये ३४ परदेशी नागरिकांसह १९७ लोक यामध्ये ठार झाले होते. ८00 पेक्षा जास्त लोक जखमी झाले. त्यात सोलापुरातील नागरिकांचाही समावेश आहे. सोलापुरात सुरक्षा व्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलीस आयुक्तालयाच्या वतीने नेहमी प्रयत्न केला जातो. शहरातील भाजी मार्केट परिसर,गर्दीचे ठिकाण असलेल्या बाजारपेठा, चित्रपटगृहे, शासकीय कार्यालये अशा ठिकाणी पोलिसांची करडी नजर असते. या परिसरात जर दहशतवादी हल्ला झालाच तर पोलीस यंत्रणा कशी सतर्क असली पाहिजे व या कृत्याचा बिमोड कसा करायचा, याची प्रात्यक्षिके वारंवार घेतली जातात. 

पोलीस आयुक्तालयात एक एटीएस (अ‍ॅन्टी टेरेरीस्ट स्कॉड) पथक व क्युआरटी (जलद प्रतिसाद पथक) ही दोन पथके कार्यरत आहेत. पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सुरक्षा विभागामार्फत प्रात्यक्षिके करून दहशतवादी हल्ल्याचा विरोध कसा करता येईल, हे दाखवून दिले जाते. एस.टी.स्टॅन्ड परिसरात दहशतवादी अतिरेकी आले आहेत, त्यांनी काही प्रवाशांना ओलीस ठेवले आहे, तेव्हा एसटी आगार प्रमुखाचा फोन १00 नंबर किंवा संबंधित पोलीस स्टेशनला जातो. तेथून हा संदेश कंट्रोलला जातो आणि अगदी काही मिनिटांत पोलीस एसटी स्टॅन्ड परिसराचा ताबा घेतात. दहशतवाद्यांशी संवाद साधत त्यांना शिताफीने अटक करतात. या सर्व प्रक्रियेसाठी परिसरातील प्रत्येक व्यक्तीची कशी मदत आवश्यक आहे आणि पोलिसांना काय सहकार्य केले पाहिजे याची माहिती मिळते. अशा पद्धतीने प्रात्यक्षिके (मॉक ड्रिल) घेतली जातात. 

बॉम्ब असलेली बॅग अन् पोलिसांची सतर्कता...
- भर बाजारपेठेत, सिनेमागृहात किंवा अन्य गर्दीच्या ठिकाणी एक बेवारस बॅग पोलिसांकडूनच ठेवली जाते, अचानक कंट्रोलला फोन येतो आणि माहिती मिळते. अवघ्या काही मिनिटांत एटीएस आणि क्युआरटीचे पोलीस बेवारस बॅगेजवळ जातात. श्वान पथकाकडून तपासणी होते, डिटेक्टर मशीनने बॅगेचा अंदाज घेतला जातो. परिसरातील लोकांना तत्काळ तेथून हलविले जाते. बॉम्ब निकामी करणारे पोलीस पद्धतशीरपणे बॅग उघडतात आणि सुटकेचा नि:श्वास घेतात.

अशा पद्धतीची प्रात्यक्षिकेही घेण्यात आली आहेत. दहशतवादी हल्ला यासारख्या कारवाया रोखण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने एटीएस व क्युआरटी ही दोन पथके नेहमी सज्ज असतात. सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचाºयांना  वारंवार सूचना दिल्या जातात. साध्या वेषात पोलीस कर्मचारी फिरून माहिती घेत असतात. शहरातील प्रत्येक बारीकसारीक हालचालींवर पोलिसांचे लक्ष असते. नागरिकांनीही तितकेच सावध असायला पाहिजे,असे आवाहन पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी केले आहे.

Web Title: Solapur city police capable of preventing terrorist attacks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.