सोलापूर शहर पोलीस दलातील कारभारी बदलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 02:21 PM2019-11-29T14:21:22+5:302019-11-29T14:23:01+5:30
तीन सहाय्यक पोलीस आयुक्तांसह २० पोलीस अधिकाºयांच्या अंतर्गत बदल्या
सोलापूर : सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील तीन सहाय्यक पोलीस आयुक्तांसह २० पोलीस अधिकाºयांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत़ नियंत्रण कक्षातील सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. प्रिती टिपरे यांची वाहतूक शाखेला नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी गुरूवारी सायंकाळी आदेशाव्दारे शहरातील विविध शाखा व पोलीस ठाण्यांची खांदेपालट केली आहे़ प्रशासन विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त रुपाली दरेकर यांची विभाग २ येथे नियुक्ती करण्यात आली आहे तर येथील महावीर सकळे यांना प्रशासनचा पदभार देण्यात आला आहे.
फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे यांची बदली सदर बझार पोलीस ठाण्याला तर त्यांच्या जागी विशेष शाखेचे सुर्यकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आले आहे़ तर पाटील यांच्या जागी सदर बझार पोलीस ठाण्याचे राजेंद्र बहिरट यांना नियुक्ती दिली आहे़ विजापूर नाका पोलीस ठाण्याचे कैलास काळे यांची नियंत्रण कक्षाला बदली करण्यात आली आहे तर त्यांच्या जागी शहर वाहतूक शाखेचे कमलाकर पाटील यांना नियुक्ती करण्यात आले आहे.
नियंत्रण कक्षातील शिवाजी राऊत यांची जेलरोड पोलीस ठाणे येथे बदली करण्यात आले आहे़ कमलाकर पाटील यांच्या जागी सुरक्षा शाखेचे संतोष काणे यांची नियुक्ती करण्यात आले आहे़ राजेंद्र करणकोट यांची जोडभावी पोलीस ठाण्यात बदली करण्यात आले आहे़ तर निवडणूक कक्षाचे हेमंत शेंडगे यांची सदर बाझार पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
जेलरोडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव माळी यांची सुरक्षा शाखेला नियुक्ती करण्यात आली आहे तर त्यांच्या जागी नियंत्रण कक्षाचे संजय क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आले आहे़ नियंत्रण कक्षाचे अमित शेटे यांची विजापूर नाका पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे़ नियंत्रण कक्षाचे जीवन निरगुडे यांची शहर वाहतूक शाखेत, नियंत्रण कक्षातील विजय पाटील यांची आर्थिक गुन्हे शाखेत आणि नियंत्रण कक्षातील नितीन पेटकर यांची एमआयडीसी पोलीस ठाण्यात बदली करण्यात आले आहे़ तर नियंत्रण कक्षाचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी मस्के यांची विजापूर नाका पोलीस ठाण्यात बदली करण्यात आले आहे़ याच बरोबर दंगा नियंत्रण कक्षाचे शशिकांत लोंढे यांची जेलरोड पोलीस ठाण्यात बदली करण्यात आले आहे.