Solapur: पहिले लग्न लपवले, मिटवण्यासाठी पतीच्या वकिल मित्राकडून धमकी, विवाहितेची फिर्याद
By रवींद्र देशमुख | Updated: July 4, 2024 19:33 IST2024-07-04T19:33:27+5:302024-07-04T19:33:53+5:30
Solapur Crime News: पहिले लग्न लपवून दुसरे केले. हा प्रकार उघडकीस येताच सासरच्या लोकांसह पतीच्या वकील मित्राकरवी प्रकरण मिटवण्यासाठी चार लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून धमकी दिल्याची तक्रार ज्योती सुजित सूर्यवंशी (हनुमान नगर, शिकलगार वस्ती, सोलापूर) या विवाहितेने पोलिसात दिली.

Solapur: पहिले लग्न लपवले, मिटवण्यासाठी पतीच्या वकिल मित्राकडून धमकी, विवाहितेची फिर्याद
- रवींद्र देशमुख
सोलापूर - पहिले लग्न लपवून दुसरे केले. हा प्रकार उघडकीस येताच सासरच्या लोकांसह पतीच्या वकील मित्राकरवी प्रकरण मिटवण्यासाठी चार लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून धमकी दिल्याची तक्रार ज्योती सुजित सूर्यवंशी (हनुमान नगर, शिकलगार वस्ती, सोलापूर) या विवाहितेने पोलिसात दिली. हा प्रकार ५ जून ते ३ डिसेंबर २०२२ मध्ये हलगरा (ता. निलंगा) येथे घडल्याचे म्हटले आहे.
या प्रकरणी जोडभावी पोलीस ठाण्यात सहाजणांविरुद्ध भा. दं. वि. ४९८ (अ), ४२० अन्वये बुधवारी (३ जुलै) रोजी गुन्हा नोंदला आहे. सुजित सूर्यवंशी (पती), सुनीता सूर्यवंशी (सासू), बलभीम सूर्यवंशी (सासरे), रोहिणी सूर्यवंशी (नणंद), अजित शाहीर, महादेव कंबळे (सर्व रा. हलगरा, ता. निलंगा) अशी गुन्हा नोंदलेल्यांची नावे आहेत.
फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादीचे निलंगा तालुक्यातील हलगरा येथे सुजित सूर्यवंशी याच्याशी लग्न झाले. सासरी गेल्यानंतर फिर्यादीला काही महिन्यानंतर पतीचे पहिले लग्न झालेले असताना सासरच्या लोकांनी फसवल्याचे कळाले.
पतीचा वकील मित्र शाहीर यांनी फिर्यादीला फोनवरुन प्रकरण मिटवण्यासाठी चार लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. अधिक तपास फौजदार बामणे करीत आहेत.