सोलापूर विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्षांसह प्रस्थापिस्तांचे पत्ते कट !

By admin | Published: October 5, 2016 04:17 PM2016-10-05T16:17:11+5:302016-10-05T16:17:11+5:30

जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षा जयमाला गायकवाड यांचा जवळा, उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांचा नातेपुते मतदार संघ राखीव झाल्यामुळे त्यांचा जिल्हा परिषदेतील पत्ता कट होणार.

Solapur With the current President, Vice President, cut the addresses of the proposals! | सोलापूर विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्षांसह प्रस्थापिस्तांचे पत्ते कट !

सोलापूर विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्षांसह प्रस्थापिस्तांचे पत्ते कट !

Next
शिवाजी सुरवसे , ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. ५ -  जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षा जयमाला गायकवाड यांचा जवळा, उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांचा नातेपुते, समाजकल्याण सभापती कल्पना निकंबे यांचा कामती, शिक्षण सभापती मकरंद निंबाळकर यांचा वैराग यांचा मतदार संघ राखीव झाल्यामुळे त्यांचा जिल्हा परिषदेतील पत्ता कट होणार आहे़. तीन मोहिते-पाटील, सुरेश हसापुरे, शिवाजी कांबळे या प्रस्थापित सदस्यांचे मतदार संघ देखील राखीव झाल्यामुळे या प्रस्थापितांवर गदा आली आहे त्यांना दुसरा मतदार संघ शोधावा लागणार आहे़
जिल्हा परिषदेच्या २०१७ साली होणा-या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ६८ गटातील आरक्षण सोडत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात काढण्यात आली़ यावेळी जिल्हाधिकारी रणजीत कुमार, उपजिल्हाधिकारी रेश्मा माळी, तहसीलदार उज्वला सोरटे उपस्थित होत्या़  पारस काळे आणि दीक्षा पवार या शालेय मुलांच्या हस्ते चिठ्ठया काढून ही सोडत काढण्यात आली़ २०११ ची लोकसंख्या आणि सन २००२, २००७ आणि २०१२ चे आरक्षण याचा विचार करुन चक्राकार पध्दतीने ही आरक्षण टाकण्यात आले़ एकूण ६८ गटापैकी ३९ मतदार संघ महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत़ जि़प़चे अध्यक्षपद देखील महिलांसाठीच राखीव आहे त्यामुळे त्या ३९ जणींमधूनच अध्यक्ष निवडला जाणार हे निश्चित आहे़
धवलसिंह मोहिते-पाटील यांचा वेळापूर मतदार संघ एससीसाठी राखीव झाला आहे़ धैर्यशील मोहिते-पाटलांचा संग्रामनगर तर अर्जुनसिंह मोहिते-पाटलांचा अकलूज मतदारसंघ महिलासाठी राखीव झाला आहे़ शिवाजी कांबळे यांचा बेंबळे मतदार संघ, सुरेश हसापुरे यांचा भंडारकवठे हा गट महिलांसाठी राखीव झाल्यामुळे त्यांची कोंडी झाली आहे़ शिक्षण समितीचे सभापती मकरंद निंबाळकर यांचा वैराग हा मतदार संघ नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाला आहे तर विद्यमान समाजकल्याण सभापती कल्पना निकंबे यांचा कामती हा मतदार संघ ओबीसी प्रवर्गासाठी खुला झाला आहे़शिवानंद पाटील यांचा हुलजंती (पूर्वीचा मरवडे) हा एससी महिलेसाठी राखीव झाल्यामुळे त्यांची देखील मोठी गोची झाली आहे़ कृषी समिती सभापती आप्पाराव कोरे यांचा मंद्रुप मतदार संघ महिलेसाठी राखीव झाला आहे़ महिला व बालकल्याण समिती सभापती अ‍ॅड़ सुकेशिनी देशमुख यांचा कासेगाव हा पंढपुरातील मतदार संघ खुला राहिला आहे त्यामुळे त्या एकमेव पदाधिकारी वगळता सर्व प्रस्तापितांना या आरक्षणाचा धक्का बसला आहे़
 
असे आहे ६८ गटांचे आरक्षण
-एकूण जागा ६८ पैकी महिलांसाठी राखीव ३९ (५० टक्के)
-खुला प्रवर्ग ३९ जागा (महिलांसाठी २० राखीव)
-अनुसूचित जाती (एससी)-१० जागा (५ जागा महिलासाठी)
-अनुसूचित जमाती (एसटी)-१ जागा (पुरुष किंवा महिला)
-नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी)-१८ जागा (पैकी ९ महिलांसाठी)
-जिल्हा परिषद अध्यक्षपद हे महिलेसाठी राखीव आहे़
 
हे आहेत ओबीसी मतदार संघ (१८ पैकी ९ महिलांसाठी)
पांगरी, वैराग, भाळवणी, यशवंतनगर, टेंभूर्णी, वाखरी, टाकळी, लक्ष्मीदहिवडी, भंडारकवठे (या ९ जागा महिलांसाठी राखीव), उपळे दुमाला, पिलीव, वागदरी, मालवंडी, कामती बु़, रोपळे, महाळूंग, घेरडी, कुंभारी (या ९ जागा ओबीस खुला प्रवर्ग)़ अनुसूचित जमाती साठी एकच मतदार संघ त्यासाठी गोपाळपूर हा मतदार संघ राखीव झाला आहे़ बोरामणी गट एससी महिलेसाठी राखीव झाल्यामुळे विद्यमान सदस्य उमाकांत राठोड यांना आता अडचण निर्माण झाली आहे़ 
 
 
हे आहेत अनुसूचित जाती (एससी) मतदार संघ (१० जागा)
- नातेपुते, जवळा, कडलास (पूर्वीचा घेरडी), हुलजंती (पूर्वीचा मरवडे) आणि बोरामणी हे पाच मतदार संघ एससी महिलांसाठी राखीव झाले आहेत तर केम, पेनूर (पूर्वीचा टाकळी सि), भोसे, वेळापूर,वळसंग (पूर्वीचा होटगी) हे एससी खुल्या गटासाठी राखीव झाले आहेत़
 
 
सर्वसाधारण गटातील मतदार  संघ (जागा ३९)
- नान्नज, मानेगाव, मोडनिंब, उपळाई ठोंगे, आष्टी, नरखेड, कासेगाव, महूद बु, एखतपूर, नाझरे, कोळा, संत दामाजीनगर, भोसे, हत्तूर, मंगरुळ, वांगी, कुर्डू, अनगर, जेऊर (हे १९ गट खुल्या प्रवर्गासाठी आहेत) तर पांडे, कुरूल, भोसरे, उपळाई बु़ बेंबळे, पानगाव, बीबीदारफळ, मांडवे, संग्रामनगर, अकलूज, बोरगाव, निमगाव, मंद्रुप, नागणसूर, सलगर, चपळगाव, वीट,  कोर्टी, करकंब, दहिगाव (हे २० मतदार संघ सर्वसाधारण गटातील महिलासाठी राखीव झाले आहेत)
 
या मतदार संघाची नावे बदलली 
- पोथरे -पांडे (नविन नाव), -माढा- उपळाई बु़, श्रीपतपिंपगरी-माळवंजे, टाकळी सिकंदर- पेनूर, तुंगत-रोपळे, चळे-गोपाळपूर, गुरसाळे-वाखरी, खर्डी- टाकळी लक्ष्मी, खुडूस-संग्रामनगर, वाडेगाव-एखतपूर, घेरडी- कडलास, चोपडी-नाजरे, बोराळे-संतदामाजीनगर, मरवडे-हुलजंती, होटगी-वळसंग, होटगी-वळसंग आदी गटांची नावे बदलली आहेत़ भोसे हा नविन गट, दहिगाव हा नवीन गट,मांडवे,घेरडी, हत्तूर असे काही नवीन गट तयार केले आहेत़
 
 
तालुकानिहाय जि़प गट 
- द़ सोलापूर (६)- बोरामणी, कुंभारी, वळसंग, हत्तूर, मंद्रुप, भंडारकवठे
- अक्कलकोट (६)-चपळगाव, वागदरी, जेऊर, मंगरुळ, नागणसूर, सलगर
- करमाळा (५)-पांडे, बीट, कोर्टी, वांगी, केम
- माढा (७)- भोसरे, मानेगाव, उपळाई बु़ कुर्डू, टेंभूर्णी, बेंबळे, मोडनिंब
- बार्शी (६)- उपळाई ठों, पांगरी, उपळे दु़, पानगाव, मालवंडी,वैराग
- उ़सोलापूर (२)-नान्नज, बीबीदारफळ
- मोहोळ (६)-आष्टी, अनगर, नरखेड, कामती बु़, पेनूर, कुरुल
- पंढरपूर (८)-करकंब, भोसे, रोपळे, गोपाळपूर, वाखरी, भाळवणी, टाकळी, कासेगाव
- माळशिरस (११)-दहिगाव, नातेपुते, मांडवे, संग्रामनगर, अकलूज, यशवंतनगर, महाळूंग, बोरगाव, वेळापूर,निमगाव, पिलीव
- सांगोला (७)-महूद बु़, एखतपूर, जवळा, कडलास, नाझरा, कोळा, घेरडी
- मंगळवेढा (४)-संत दामाजीनगर, हुलजंती, लक्ष्मीदहिवडी,भोसे
 

 

Web Title: Solapur With the current President, Vice President, cut the addresses of the proposals!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.